विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद किंवा राज्यमंत्रिपद तसेच कोणत्याही महामंडळाची जबाबदारी नाही. तरीसुद्धा त्यांच्यासोबत दोन पोलिसांच्या गाड्या आणि 10 पोलिसांचा बंदोबस्त दिवस-रात्र असतो. या व्यतिरिक्त त्यांच्या बंगल्यावर सुद्धा पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे.
सत्तार ना मंत्री ना संविधानिक पदावर, मग त्यांना एवढी सुरक्षा का?
सिल्लोड शहर पोलीस स्टेशनला सध्या 37 पोलीस आणि चार अधिकाऱ्यांचा स्टाफ आहे. शहरात विविध गुन्हेगारी घटना सातत्याने घडत आहेत. अगोदरच पोलिसांवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर कामाचा ताण आहे. अशा परिस्थितीत अब्दुल सत्तार यांना इतका मोठा पोलीस बंदोबस्त देणे योग्य नाही. त्यामुळे आमदाराला दिलेला पोलीस बंदोबस्त तत्काळ कमी करण्यात येऊन जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस यंत्रणेचा सदुपयोग करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
advertisement
भाजप आणि अब्दुल सत्तार यांचे वारंवार खटके
स्थानिक माजी नगरसेविका रूपाली मोरेलू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अब्दुल सत्तार यांचे पोलीस संरक्षण कडून घ्यावे, अशी मागणी केली आहे. या मागणीमागे भाजप आणि अब्दुल सत्तार यांचे सख्य नसल्याने वारंवार उडत असलेले खटकेही कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.
