TRENDING:

राज्यात सेनेची गाडी सुसाट, भाजपच्या एका खेळीने शिंदेंचं वाढलं टेन्शन, 16 तारखेला करेक्ट कार्यक्रम?

Last Updated:

स्वबळावर निवडणूक लढवत एकनाथ शिंदेंनी ५६ ठिकाणी आपले नगराध्यक्ष निवडून आणले. राज्यात शिंदेंची गाडी सुसाट आहे. मात्र भाजपच्या एका खेळीने एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राज्यातील नगर पंचायती आणि नगर परिषदांचा निकाल लागला आहे. भाजप हा राज्यातील सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी देखील आपल्या नेतृत्वाची झलक दाखवली. स्वबळावर निवडणूक लढवत ५६ ठिकाणी आपले नगराध्यक्ष निवडून आणले. राज्यात शिंदेंची गाडी सुसाट आहे. मात्र भाजपच्या एका खेळीने एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढलं आहे. ज्यामुळे येत्या १६ जानेवारीला शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे.
News18
News18
advertisement

खरं तर, नगर परिषद आणि नगर पंचायतींचा निकाल लागण्यापूर्वीच राज्यात महानगर पालिकांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील २९ महानगर पालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. तर १६ जानेवारीला निकाल लागणार आहे. या निकालात एकनाथ शिंदेंना आता मोठा धक्का बसू शकतो. अशी शक्यता वर्तवली जात आहे. याचं कारण म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपनं शिंदे गटाला बालेकिल्ल्यात दिलेले हादरे.

advertisement

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभेतील अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव झाला असून, येथे भाजपच्या तेजश्री करंजुले विजयी झाल्या आहेत. त्यांनी इथली ३५ वर्षांची सत्ता संपुष्टात आणली आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेतही भाजपच्या रुचिता घोरपडे यांनी सेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या पत्नीचा आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वीणा म्हात्रे यांचा पराभव केला आहे. हे दोन्ही नगर परिषदा वर्षानुवर्षे शिवसेनेचे गड राहिले आहेत. पण भाजपनं शिंदेंच्या या गडांना सुरुंग लावला आहे. त्यामुळे आगामी ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईची महानगर पालिका निवडणूक शिंदेंसाठी सोपी असणार नाही, असाच संदेश देण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला आहे.

advertisement

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं जोरदार मुसंडी मारल्याने ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईत जागा वाटपात भाजपचा दबाव आता वाढण्याची शक्यता आहे. महायुतीचा धर्म पाळण्यासाठी या महापालिकांमध्ये शिंदेंना बॅकफुटवर जावं लागू शकतं. शिंदेंनी राज्यभरात चांगलं यश मिळवलं असलं तरी भाजपच्या या खेळीमुळे आगामी निवडणुकीत आपला बालेकिल्ला सांभाळण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं डोकं लावलं, डाळिंबीच्या बागेत पैशाचं पीक, अर्ध्या एकरात 2 लाखांचं...
सर्व पहा

अंबरनाथ आणि बदलापूरमधील भाजपच्या विजयामुळे ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईत एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी होईल. येथील वाटाघाटीत एकनाथ शिंदे अडकले तर राज्यातील इतर महापालिकांमध्ये भाजप शिंदेंना ओव्हर टेक करून खूप पुढे निघून जाऊ शकते, असं देखील राजकीय विश्लेषकांचं मत आहे. साहजिकच याचा परिणाम मुंबई महानगर पालिकेत देखील दिसून येईल. इथंही शिंदेंची पिछेहाट होण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राज्यात सेनेची गाडी सुसाट, भाजपच्या एका खेळीने शिंदेंचं वाढलं टेन्शन, 16 तारखेला करेक्ट कार्यक्रम?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल