TRENDING:

Maharashtra Elections Ajit Pawar : निवडणूक निकालानंतर शरद पवारांचा महायुतीला पाठिंबा? अजितदादांच्या उत्तराने चर्चांना उधाण

Last Updated:

Maharashtra Elections : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार हे महायुतीला पाठिंबा देणार का, यावर भाष्य केले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बारामती :  राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचार सभांचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत आहे. तर, दुसरीकडे निवडणूक निकालानंतर वेगळ्या घडामोडी घडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार हे महायुतीला पाठिंबा देणार का, यावर भाष्य केले आहे.
निवडणुकीनंतर शरद पवारांचा महायुतीला पाठिंबा? अजितदादांच्या उत्तराने चर्चा...
निवडणुकीनंतर शरद पवारांचा महायुतीला पाठिंबा? अजितदादांच्या उत्तराने चर्चा...
advertisement

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. त्यावेळी अजित पवारांनी म्हटले की, यावेळी आमच्या कुटुंबातून दोघेजण उभं राहिलो आहेत. काका पुतण्याची परंपरा कायम असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीत मतदार राजाचा कौल मान्य करावा लागतो. मी माझ्या परीने माझी बाजू मांडत आहे तर, ते त्यांची बाजू मांडत आहेत. मतदार सूज्ञ असून ते योग्य कौल देतात. माझा अभिमन्यू झाला असं अजिबात वाटत नसून सगेसोयरे पण माझ्या बाजूने आहेत, असेही अजित पवारांनी म्हटले.

advertisement

शरद पवार पाठिंबा देणार?

विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार हे महाविकास आघाडीतून बाहेर पडत महायुतीला पाठिंबा देणार असल्याचे चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांनी यावर भाष्य करताना म्हटले की, शरद पवारांच्या मनात काय आहे त्याचा थांगपत्ता कुणालाच लागू शकत नाही, असेही अजित पवारांनी म्हटले. अजित पवार यांनी सांगितले की, निवडणुकीबाबतचे त्यांचे धोरण लक्षात आले नाही. 2014 मध्ये निकाल जाहीर होण्याआधी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यानंतर सरकार स्थापन होणार होते. मात्र, 25 वर्षांची शिवसेना सोबतची युती तोडू शकत नसल्याचे भाजपने सांगितले आणि सरकार स्थापन करण्यास नकार दिला. त्यामुळे आम्ही सरकारमध्ये गेलो नाही 2019 ला तुम्ही पाहिलं भाजपबरोबर चर्चा झाली आणि अचानक काय नेत्यांचे विचार बदलले आणि वरिष्ठांचे आणि ठरवलं. अचानक ठरलं की शिवसेनेच्या मंत्र्यांना मुख्यमंत्री करायचं आहे, असा किस्सा अजित पवारांनी सांगितला.

advertisement

शरद पवारांच्या निवृत्तीची किंमत चुकवली...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं डोकं लावलं, डाळिंबीच्या बागेत पैशाचं पीक, अर्ध्या एकरात 2 लाखांचं...
सर्व पहा

मी त्याबद्दल खूप मोठी किंमत चुकवली आहे. मला व्हिलन म्हणून महाराष्ट्रातील जनतेनं ठरवलं आहे. अशा प्रकारचा प्रसंग यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेला होता. ते सगळं जाहीर केल्यानंतर दोन ते तीन दिवसातचं त्यांनी तो निर्णय फिरवला. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर, उद्याला त्यांच्या मनात नक्की काय आहे महाराष्ट्रातील आजपर्यंत कोणालाच कळलेलं नाही, अगदी मी घरातला असलो तरी घरातल्या व्यक्तीलाही कळलेलं नाही, असेही अजित पवारांनी म्हटले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Ajit Pawar : निवडणूक निकालानंतर शरद पवारांचा महायुतीला पाठिंबा? अजितदादांच्या उत्तराने चर्चांना उधाण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल