TRENDING:

'सर्वसामान्याकडे पैसे सापडले तर कारवाई होते, मग शिरसाटांना वेगळा न्याय का?' खासदाराचा थेट सवाल

Last Updated:

व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहेत की पैशाची बॅग त्या ठिकाणी आहे. याचा तपास होणं गरजेचं आहे आणि सरकारने गंभीर दखल घेतली पाहिजे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नरेंद्र मते, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

वर्धा:  "राज्याच सरकार अतिशय असंवेदनशील असं सरकार आहे. संजय गायकवाड यांनी कँटीन कर्मचाऱ्याला केलेली मारहाण पाहता लोकप्रतिनिधी म्हणून आम्हालाही लाज वाटते. दुसरीकडे राज्याचे मंत्री संजय सिरसाट यांच्या घरातील व्हिडीओ जो व्हायरल झाला त्यात बॅगेत नोटाचे बंडलं दिसत आहे. एवढ्या नोटा त्यांच्याकडे आल्या कुठून, कोणाच्या होत्या? याचा तपास करण्यात यावा. एखाद्या सामान्य थोडीफार अधिकची संपत्ती सापडल्यास त्याच्यावर कारवाई केली जातं. मग, हाच न्याय मंत्र्याला का नाही? असा थेट सवाल  वर्ध्याचे शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांनी उपस्थित केला.

advertisement

वर्धेच्या नियोजन भवन इथं दिशा समितीच्या बैठक पार पडली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधत असताना खासदार अमर काळे यांनी संजय शिरसाट यांच्या कॅश बॅग प्रकरणाची चौकशीची मागणी केली.

" शुक्रवारी संजय शिरसाट यांचा व्हिडिओ बघण्यामध्ये आला. त्यात संजय शिरसाट हे स्वतःच्या घरामध्ये रूममध्ये बसलेले आहे आणि तिथे बॅग बाजूला आहे. त्या बॅगमध्ये पैसे स्पष्ट दिसत आहे. इतका पैसा त्यांच्याकडे आला कसा, कोणाचा आहे आणि कुठून आला याची सरकारने दखल घेत तपास केला पाहिजे, अशी मागणी काळे यांनी केली.

advertisement

'एखाद्याकडे थोडाफार अधिकची संपत्ती असली तर तात्काळ आपण त्यांच्यावर कारवाई करतो. अशी अपेक्षा आहे की जो न्याय सर्वसामान्यांना आहे, तोच न्याय मंत्र्यांनाही लागू राहिला पाहिजे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहेत की पैशाची बॅग त्या ठिकाणी आहे. याचा तपास होणं गरजेचं आहे आणि सरकारने गंभीर दखल घेतली पाहिजे. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो, असं अमर काळे यावेळी म्हणाले.

advertisement

'संजय गायकवाड यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे'

तसंच, 'अतिशय असंवेदनशील असं सरकार राज्यात आहे. ज्या पद्धतीने संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये जातं कर्मचाऱ्याला मारहाण केली वास्तविक पाहता लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सुद्धा त्या गोष्टीचा लाज वाटते. अशा कृतीमुळे लोकप्रतिनिधीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन सुद्धा या निमित्ताने वाईट होत आहे. कृती एकाची असते पण त्याचं भोगाव सर्वांना लागते. त्यामुळे आमची सुद्धा संजय गायकवाड यांच्या या कृतीमुळे लोकांमध्ये राहून काम करत असताना आमची सुद्धा प्रतिमा डागाळल्या जाते. इतकं असताना सुद्धा ज्या पद्धतीने मारहाण केले ज्या पद्धतीने बुक्या मारल्या जसं काही बॉक्समध्ये बुक्क्या मारल्या तसा मारण्याचा काम केलं. असं असताना सुद्धा संजय गायकवाड वर अदखलपात्र गुन्हा दाखल होत असेल तर गृहखात मुख्यमंत्र्यांकडे आहेत, त्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेतली पाहिजे. संजय गायकवाड यांच्यावर त्या निमित्ताने गुन्हे दाखल केले पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे, असंही ते म्हणाले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'सर्वसामान्याकडे पैसे सापडले तर कारवाई होते, मग शिरसाटांना वेगळा न्याय का?' खासदाराचा थेट सवाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल