TRENDING:

CBSE बोर्डाचा मोठा निर्णय, आता वर्षातून दोनदा होणार दहावीची परीक्षा, नियमावली काय?

Last Updated:

CBSE Exam: सीबीएसईने दहावीच्या बोर्ड परीक्षांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता दहावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा होणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी बोर्डाच्या परीक्षेबाबत मोठा निर्णय घेतला असून दहावी बोर्डाच्या परीक्षेबाबत नवीन धोरण लागू केले आहे. त्यामुळे आता दहावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा होणार आहेत. त्यामुळे 2026 पासूनच्या विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा फेब्रुवारी आणि मे महिन्यात अशी दोनदा देता येईल.
CBSE बोर्डाचा मोठा निर्णय, आता वर्षातून दोनदा होणार दहावीची परीक्षा, नियमावली काय?
CBSE बोर्डाचा मोठा निर्णय, आता वर्षातून दोनदा होणार दहावीची परीक्षा, नियमावली काय?
advertisement

सीबीएसई बोर्डाने नव्याने लागू केलेल्या नियमांनुसार दहावी बोर्ड परीक्षांमध्ये बदल होणार आहेत. हे बदल 2026 पासून लागू करण्यात येतील. या नव्या नियमांनुसार एकाच शैक्षणिक वर्षात दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन वेळा परीक्षा देता येईल. या निर्णयामागे दहावीच्या विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी करणे आणि त्यांच्या कामगिरीत सुधारणा करण्याची संधी देणे, हा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

advertisement

Success Story: बापाचं स्वप्न लेकाने पूर्ण केलं, बंद पडलेला व्यवसाय सुरू केला, आता कमाई लाखात! Video

फेब्रुवारीत परीक्षा देणं अनिवार्य

सीबीएसईच्या नव्या निर्णयानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला फेब्रुवारीत होणारी बोर्ड परीक्षा देणं अनिवार्य असणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांमध्ये सुधारणा करायची आहे, असे विद्यार्थी मे महिन्यात होणारी दुसरी परीक्षा देऊ शकतात. परंतु, एका वर्षात दोन वेळा परीक्षा घेण्यात येणार असल्या तरी विद्यार्थ्याचं अंतर्गत मूल्यमापन वर्षातून एकदाच होणार आहे. हे नियम 2026 पासून लागू होणार असून नव्या नियमांबाबत विद्यार्थी आणि पालकांकडून सूचना मागवल्या जातील.

advertisement

सीबीएसईचा निर्णय काय?

दहावी बोर्डाच्या परीक्षा 2026 पासून वर्षातून दोनदा घेतल्या जातील. परीक्षेचा पहिला टप्पा फेब्रुवारी महिन्यात तर दुसरा टप्पा मे मध्ये पार पडेल. पहिली परीक्षा अनिवार्य तर दुसरी ऐच्छिक असणार आहे. पहिल्या टप्प्यातील निकाल एफ्रिल तर दुसऱ्या टप्प्यातील जूनमध्ये जाहीर केले जातील. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना गुण सुधारण्याची संधी मिळेल. या शैक्षणिक वर्षात अंतर्गत मूल्यांकन केवळ एकदाच होणार असून दोन्ही टप्प्यांसाठी तेच लागू असेल.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
CBSE बोर्डाचा मोठा निर्णय, आता वर्षातून दोनदा होणार दहावीची परीक्षा, नियमावली काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल