याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आजदे गावाच्या हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची 60 हजार रुपये किमतीची साखळी चोरट्यांनी चोरून नेली. त्यानंतर, 90 फुटी रस्ता भागातील चामुंडा सोसायटी परिसरात एका वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावली होती. या प्रकरणांतील चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेली एक आंतरराज्य टोळी देखील कल्याण-डोंबिवली पोलिसांनी जेरबंद केली आहे. तरी देखील दररोज नवीन घटना घटत आहेत.
advertisement
Weather Alert: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी वारं फिरलं, कोकणात मुसळधार, मुंबई-ठाण्याला अलर्ट
नुकतीच डोंबिवली पूर्वेतील भोपर गाव भागात पुन्हा एक सोनसाखळी चोरीची घटना घडली आहे. एक 43 व्यक्ती शनिवारी (20 सप्टेंबर) आपल्या मुलीसह किराणा दुकानातील सामान आणि भाजीपाला घेऊन पायी घरी चालले होते. त्यावेळी पाठीमागून अचानक एक दुचाकी त्यांच्या अंगावर आली. या प्रकाराने मुलगी आणि वडील दोघेही घाबरले. तेवढ्यात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एका व्यक्तीने मुलीच्या वडिलांच्या मानेवर जोराचा फटका मारला आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला.
वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. काही ग्रामस्थांनी चोरांना धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे. चोरांना पळण्यासाठी गावातून एक ते दोन रस्ते असतात. त्यामुळे गाव हद्दीत या चोरट्यांनी लूट केली तर त्यांना कोंडून पकडून आम्ही घडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असं ग्रामस्थ म्हणाले आहेत.