एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडू नका, असे भावनिक आवाहन शिवसैनिकांना केले. आपण जोरदारपणे काम करू, पुन्हा शिवसेनेला यश मिळवून देऊ पण हे सर्व करायला उद्धवसाहेबांना तुमची साथ हवी आहे, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.
माझे काही चुकले तर मला सांगा पण...
शिवसैनिकांनो, तुम्हाला हात जोडून विनंती करतो. तुमच्यासमोर दंडवत घालतो पण पक्ष सोडून जाऊ नका. आपण सर्वजण एकत्र आहोत. जोरदारपणे काम करू, पुन्हा शिवसेनेला यश मिळवून देऊ. माझे काही चुकले तर मला सांगा, मी सुधारणा करेन, माझ्या रागावण्यावर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. माझा राग थोड्या वेळापुरता असतो, तुम्ही मला बोलू शकता, पण दुसरा काही निर्णय घेऊ नका, अशी भावनिक साद खैरे यांनी घातली.
advertisement
ज्येष्ठ नेते नंदकुमार घोडेले यांच्या शिंदे सेनेच्या प्रवेशावर खैरे म्हणाले...
नंदकुमार घोडेले यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत मागील आठवड्यात प्रवेश केला. त्यावर बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, घोडेले यांना त्यावेळी संभाजीनगरचे महापौर करायचे नव्हते. ही माझी भूमिका होती. परंतु नंदकुमार घोडेले हे त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेले आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मी म्हटलो तर तुला महापौर करेल असे म्हणाले. त्यावेळी मी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर नंदकुमार घोडेले महापौर झाले. नंदकुमार घोडेले यांच्या पत्नीला ज्यावेळी अडीच वर्षे महापौर केले, त्यावेळी त्यांच्या केबिनमध्ये बसून नंदकुमार घोडेले हे महापौरपद गाजवायचे. याचा अर्थ नंदकुमार घोडेले हे स्वार्थासाठी आले होते, आणि स्वार्थासाठी गेले. शिंदे गटात गेल्यानंतर नंदकुमार घोडेले यांना मानपान मिळणार नाही. त्यांना मानसन्मान मिळाला तर नंदकुमार घोडेले यांनी घेतलेला निर्णय मी चांगला समजेल, असे खैरे म्हणाले.
