TRENDING:

... हे तुम्हाला शोभत नाही, चंद्रकांत पाटील यांनी सुरेश धस यांना खडसावले

Last Updated:

Suresh Dhas: भाजप आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्यावरून नवा वाद उभा राहिला असून भाजपचे वरिष्ठ नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यात रोष निर्माण झालेला असून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. विरोधकांसह सत्ताधारी पक्षाचे आमदारही बीडमधील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवरून अनेक गंभीर आरोप करीत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. यादरम्यान त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्यावरही टिप्पणी केली. धस यांच्या वक्तव्यावरून नवा वाद उभा राहिला असून भाजपचे वरिष्ठ नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत.
सुरेश धस आणि चंद्रकांत पाटील
सुरेश धस आणि चंद्रकांत पाटील
advertisement

सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे नाव घेऊन टिप्पणी केल्यावर तिने शनिवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला. स्त्रीच्या अंगावर शिंतोडे उडविण्याचे काम करू नका. कुणाचे नाव कुणाशी जोडू नका, अशी प्रांजळ विनंती तिने सुरेश धस यांना केली. सिनेसृष्टीतून धस यांच्या टिप्पणीवर तीव्र आक्षेप घेतला जात असताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी धस यांना सुनावले आहे.

advertisement

....असं बोलणे आपल्याला शोभत नाही

सुरेश धस हे माझे मित्र आहेत पण बीडसारख्या घटनेवेळी बोलताना सामाजिक भान आणि संवेदनशीलपणे बोलणे आवश्यक आहे, असे सांगत कोणत्याही महिलेची नाचक्की आणि बदनामी होईल असं बोलता कामा नये, असे बोलणे आपल्याला शोभत नाही, अशा कडक शब्दात चंद्रकांत पाटील यांनी सुरेश धस यांना खडसावले.

आपल्यावर शिवरायांचे संस्कार, आपली शिकवण विसरता कामा नये

advertisement

चंद्रकांत पाटील यांनी सुरेश धस यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संस्कारांची आठवण करून दिली. ते म्हणाले, आपण शिवरायांचे वंशज आहोत. स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नये, याची शिकवण आपल्याला महाराजांनी दिली आहे. ही शिकवण आपण विसरता कामा नये. खरे तर सुरेश धस यांनी माफी मागायला हवी.

मी सुरेश धस यांना फोन केला पण संपर्क झाला नाही, त्यांनी माफी मागायला हवी

advertisement

सुरेश धस यांच्या टिप्पणीनंतर मी त्यांच्याशी संपर्क केला. परंतु प्रवासात असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. शनिवारी प्राजक्ताने पत्रकार परिषद घेऊन तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुरेश धस यांनी कोणत्याही महिलेची नाचक्की आणि बदनामी होईल असं बोलता कामा नये, अशी सूचनावजा विनंती करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
... हे तुम्हाला शोभत नाही, चंद्रकांत पाटील यांनी सुरेश धस यांना खडसावले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल