TRENDING:

Chhagan Bhujbal Anjali Damania : वाह फडणवीस वाह ! भुजबळ सत्तेत, हीच मोदींची कारवाई का? दमानियांचा संताप

Last Updated:

Chhagan Bhujbal Anjali Damania : भुजबळांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. तर, दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर दमानियांनी वार केला असून पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेचा हवाला दिला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  राज्यातील महायुती सरकारमध्ये आज छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. साडेचार महिन्यापूर्वी झालेल्या शपथविधी सोहळ्यात मंत्र्यांच्या यादीतून भुजबळांच्या नावावर फुली मारण्यात आली. आज मात्र भुजबळांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. तर, दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर दमानियांनी वार केला असून पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेचा हवाला दिला.
News18
News18
advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांना दिली जाणार असल्याची माहिती आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्याशी असलेल्या संबंधावरून धनंजय मुंडे यांना मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता भुजबळांची एन्ट्री होणार आहे. अंजली दमानिया यांनी भुजबळांच्या मंत्रीपदाला विरोध करत संताप व्यक्त केला आहे. वाह फडणवीस वाह !म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जमणा? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमच काहीच वाकड करू शकत नाही ? अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

advertisement

दमानिया यांनी म्हटले की, हेच भुजबळ जेव्हा जेल मधे होते, तेव्हा एक अगदी बिचाऱ्या सारखा फोटो माध्यमांमध्ये दाखवला जायचा. तेव्हा छातीत कळ यायची. मग आता ठणठणीत ? किळस वाटतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची, अशी मोठी खंत दमानिया यांनी व्यक्त केली.

अंजली दमानिया यांनी काय म्हटले?

छगन भुजबळ मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेणार ?

advertisement

वाह फडणवीस वाह !

म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जमणा? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमच काहीच वाकड करू शकत नाही ?

असा काय नाईलाज आहे ?

की सभ्य माणसं मिळत नाहीत राजकारणात ?

आणि हो, हेच भुजबळ जेव्हा जेल मधे होते, तेव्हा एक अगदी बिचाऱ्या सारखा फोटो माध्यमांमध्ये दाखवला जायचा. तेव्हा छातीत कळ यायची. मग आता ठणठणीत ?

advertisement

किळस वाटतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची

खालच्या घोषणा आठवतात ?

“भ्रष्टाचारीयो पर कारवाई के लिए, अब की बार ४०० पार”

“भ्रष्टाचार के खिलाफ मोदी सरकार के बडे कदम”

हा आहे का तो बडा कदम ? ही ती कारवाई ?

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chhagan Bhujbal Anjali Damania : वाह फडणवीस वाह ! भुजबळ सत्तेत, हीच मोदींची कारवाई का? दमानियांचा संताप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल