छगन भुजबळ माध्यमांशी बोलत होते. यावेळी ईव्हिएमवर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, जरांगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. कारण मला एका मोठ्या वर्गाची मतं मिळाले नाहीत. त्यामुळे माझं मताधिक्य कमी झालं,असे विधान करून भुजबळांनी जरांगे फॅक्टर चालल्याचा दावा केला. तसेच माझ्या मतदार संघात जरांगे रात्री 2 वाजे पर्यंत फिरत होते. त्यामुळे माझे मतदान 2 लाखांपर्यंत गेले नसल्याचा दावा करत भुजबळांनी जरांगेंवर आरोप केला.
advertisement
तसेच भूजबळ पुढे म्हणाले, आता मला सांगा ईव्हीएममध्ये जर गडबड आहे, तर हा सुद्धा विरोध बाजूला सूरुन मला देखील 1 लाख मतं मिळायला हवी होती. मग माझी मतं का कमी झाली.हा एक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. लोकसभेला बरोबर होतं आता चुक कसं?. आता काही तरी कारणे शोधावी लागतात.कुणावर तरी खापर फोडाव लागतं. ईव्हिएम एक निर्जीव वस्तू आहे, त्याच्यावर खापर फोडण सोप असतं, असे म्हणत भुजबळांनी विरोधकांना टोला लगावला.
महायुतीच्या मुख्यमंत्रीपदावर बोलताना भुजबळ म्हणाले की, 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणे हे स्वाभाविक आहे. यात आक्षेप घेण्यासारखे काहीच कारण नाही आहे. तसेच या आधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळेस फडणवीस म्हणाले मी बाहेर राहून काम करेल. मात्र दिल्लीवरून त्यांना पक्षाने तुम्हाला उपमुख्यमंत्री घ्यावं लागेल,असा संदेश दिला. तेव्हा ती एक प्रकारची अवहेलना सहन करून ते उपमुख्यमंत्री झाले. तरी पूर्णपणे त्यांनी त्यांच्या कामाला झोकवून दिलं. तसेच आता महायुतीला पूर्ण बहुमत मिळून देण्याचं काम त्यांनी केलं आहे. किंबहुना सर्व मागासवर्गीय आणि ओबीसी यांच्या अधिकारांवर कुठे गदा येऊ नये यासाठी फडणवीस यांनी सहकार्य केले आहे. म्हणून त्यांना काही लोक प्रचंड टार्गेट करतायत,असे म्हणत भुजबळांनी जरांगेंना टोलाही लगावला.
