TRENDING:

Chhagan Bhujbal : सगळ्या पुतण्यांचा DNA सारखाच, छगन भुजबळांचं वक्तव्य चर्चेत

Last Updated:

Sameer Bhujbal : शिवसेनेकडून नांदगाव मतदारसंघातून सुहास कांदेंना उमेदवारी दिल्यानंतर माजी खासदार समीर भुजबळ यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याचं जाहीर केलंय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक : विधानसभा निवडणुकीत नांदगाव मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झालीय. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, समीर भुजबळ यांच्या या निर्णयानंतर शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांवर निशाणा साधला आहे. भुजबळ गद्दार असून गद्दारीचा इतिहास असल्याचं कांदे यांनी म्हटलंय. तिन्ही भुजबळांनी पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा देऊन बिनधास्त निवडणूक लढवावी असं आव्हान आमदार सुहास कांदे यांनी दिलंय. दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी सुहास कांदेंना प्रतिआव्हान देत येवल्यात यावं आणि लढावं असं म्हटलंय.
News18
News18
advertisement

महायुतीतले दोन नेते आमने-सामने आले असून आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यातला वाद टोकाला गेलाय. त्यातच समीर भुजबळ यांच्या भुमिकेने खळबळ उडाली आहे. समीर भुजबळ यांच्या भूमिकेबाबत विचारले असता छगन भुजबळ यांनी म्हटलं की, सगळ्या पुतण्यांचा डीएनए सारखाच असतो. समीर भुजबळ हे सुहास कांदे यांना उत्तर देतील. कांदे यांच्या आरोपाला कोर्टात उत्तर देऊ.

advertisement

आदित्यविरोधात शिंदे गटाचा मोठा डाव, 'या' तगड्या उमेदवाराला वरळीत उतरवणार

सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदनवरून अनेक आरोप केले. यावर कांदे यांच्या आरोपाला मी कोर्टात उत्तर देईन असं म्हटलंय. आम्हाला कोणतीही नोटीस आली नाहीय. त्यांनीच सांगितलंय की पुन्हा अपिलात गेलं आहे. महायुतीत असताना अपिलात जाण्याची गरज काय असा सवाल भुजबळ यांनी विचारलाय.

advertisement

नाशिकमध्ये दहशतीचं वातावऱण असल्याचं म्हटलं जातंय. यावर भुजबळ म्हणाले की, कुणीही सांगावे भीतीचं वातावरण कुणी केलं. त्यांच्यासारखे भीतीचे वातावरण करत नाही. आम्ही जमिनी लाटत नाही, खोट्या केसेस टाकत नाही, जेलमध्ये टाकत नाही. आम्ही फक्त विकासाचे काम मांडतो. कांदे यांनी निश्चित येवल्यात यावे स्वागत करतो. मागील वेळेपेक्षा 25 हजार अधिकचा लीड मिळेल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं डोकं लावलं, डाळिंबीच्या बागेत पैशाचं पीक, अर्ध्या एकरात 2 लाखांचं...
सर्व पहा

समीर भुजबळ हे नांदगावमधून अपक्ष निवडणूक लढणार आहेत. या मतदारसंघातून शिवसेनेने विद्यमान आमदार सुहास कांदे यांना उमेदवारी दिली आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने नांदगावमधून गणेश धात्रक यांना तिकीट दिलं आहे, त्यामुळे नांदगावमध्ये तिरंगी लढत होणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chhagan Bhujbal : सगळ्या पुतण्यांचा DNA सारखाच, छगन भुजबळांचं वक्तव्य चर्चेत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल