आदित्यविरोधात शिंदे गटाचा मोठा डाव, 'या' तगड्या उमेदवाराला वरळीत उतरवणार

Last Updated:

राज्यसभा खासदार असणाऱ्या मिलिंद देवरा हे वरळीतून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईतून दोन वेळा खासदार होते.

News18
News18
मुंबई :  शिवसेना शिंदे गटाने वरळीत आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी मिलिंद देवरा यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभा खासदार असणाऱ्या मिलिंद देवरा हे वरळीतून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईतून दोन वेळा खासदार होते. सध्या ते शिवसेनेचे राज्यसभा खासदार आहेत. त्यांचे वडील मुरली देवरा हे मुंबईचे महापौर आणि केंद्र सरकारमध्ये मंत्री होते.
एकनाथ शिंदे यांच्याकडून आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार उतरवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. यासाठी पक्षाकडून अनेक नावांची चाचवणी करण्यात आली. भाजप प्रवक्त्या शायना एनसी यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. पण त्यांच्या ऐवजी मिलिंद देवरा यांचे नाव आता समोर येत आहे.
वरळीत मराठी मतदार, मच्छिमार आणि उच्चभ्रू लोकवस्ती असलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. वरळीत मनसेकडून गेल्यावेळी कोणताही उमेदवार दिला गेला नव्हता. पण यावेळी मनसेने संदीप देशपांडे यांना मैदानात उतरवलंय. त्यांना शिवसेनेकडून पाठिंबा मिळेल असं म्हटलं जात होतं. पण शिंदेंनी आदित्य ठाकरेंविरोधात शिवसेनेचा उमेदवार उतरवण्याचा चंग बांधला आहे. यामुळे वरळीत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
advertisement
आदित्य ठाकरे यांनी बुधवारी वरळी विधानसबा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. आदित्य ठाकरे हे २०१९ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढले. त्यांनी ६७ हजार मतांनी निवडणूक जिंकली. २०१९ च्या निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश माने यांचा पराभव केला होता. आदित्य ठाकरे यांना उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात स्थान दिलं होतं. लोकसभेत शिवसेना ठाकरे गटाला वरळीत ६७०० मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळेच मिलिंद देवरा मैदानात उतरल्यास आदित्य ठाकरेंना निवडणूक जिंकणं कठीण जाऊ शकतं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आदित्यविरोधात शिंदे गटाचा मोठा डाव, 'या' तगड्या उमेदवाराला वरळीत उतरवणार
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement