राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांना दिली जाणार असल्याची माहिती आहे. छगन भुजबळ गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिपद न मिळाल्याने नाराज होते. आता त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होत असल्याने कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
छगन भुजबळ यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढवली आणि विजयी झाले. छगन भुजबळ यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात संपत्तीबाबत माहिती दिली होती. त्यानुसार, त्यांच्याकडे ट्रॅक्टर, पिकअप, स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे.
advertisement
छगन भुजबळांच्या पत्नीच्या नावे संपत्ती...
2024 च्या निवडणूक शपथपत्रानुसार, छगन भुजबळ यांच्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता 16 कोटी 53 लाख रुपये आहे. मीना भुजबळ यांच्या नावे 2 कोटी 38 लाख 29 हजार 52 रुपयांची जंगम तर 86 लाख 21 हजार 572 रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मीना भुजबळ यांच्या नावावर 21 लाख 10 हजार 250 रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्याकडे 32 लाख 76 हजार रुपयांचे 455 ग्रॅम सोने, 4 लाख 37 हजारांची 5,150 ग्रॅम चांदी तर 22 लाख 5 हजारांच्या इतर मौल्यवान वस्तू आहेत. मीना भुजबळ यांच्या नावावर एक पिकअप वाहन देखील आहे.
छगन भुजबळांची संपत्ती किती?
निवडणूक शपथपत्रानुसार, छगन भुजबळ यांच्याकडे एकूण 11 कोटी 20 लाख 41 हजार रुपयांची मालमत्ता आहे. तर, भुजबळांवर 24 लाख 56 हजारांचे कर्ज आहे. छगन भुजबळ यांच्या नावावर दोन शेतजमीन, दोन घरं असून त्यांनी 3 लाखांची रक्कम ही न्यायालयात अमानत म्हणून भरली आहे. छगन भुजबळांच्या नावावर एक ट्रॅक्टर असून 585 ग्रॅम सोनं आहे.