लहानपणापासूनच दिव्यांची आवड आहे, वयाच्या सोळाव्या वर्षापासून समई आणि दिवे जपून ठेवायला सुरुवात केली. देवपूजेचे वेड असल्यामुळे वेगवेगळ्या देवपूजेमध्ये आपल्याला कोणते दिवे कामाला येतील, त्या पद्धतीने दिवे घेतले गेले. आणि नंतर हळूहळू दिव्यांचा तो छंदच झाला. कोणत्याही ठिकाणी गेल्यानंतर दिवे आकर्षित करीत असे, जवळपास आता साडेचारशे दिवे आहेत असे देखील भांड यांनी म्हटले आहे.
advertisement
पर्यटन स्थळांना भेट देण्याची आवड असल्यामुळे भारत आणि भारताबाहेर विदेशात देखील आशा आणि त्यांचे पती बाबा भांड फिरायला जात असतात. अनेक देश फिरले त्यामुळे त्या त्या ठिकाणी काही वैशिष्ट्यपूर्ण दिवे दिसल्यास ते आम्ही आणलेले आहेत. दक्षिण भारत, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यासह विविध ठिकाणाहून दिवे आणले. मात्र विदेशात भारतासारखी दिव्यांची परंपरा आणि संस्कृती नाही, त्यामुळे तिकडे काही मोजकेच दिवे मिळतात त्यापैकी जॉर्डनला अल्लाउद्दीनचा किंवा म्हटले जाते त्याला तो दिवा मिळाला आणि तो आणला. नेपाळ, श्रीलंका, चीन, या ठिकाणाहून देखील काही दिवे आणले आहेत, असे आशा भांड सांगतात.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला गोल आकाराचा आणि तांब्याचा असलेला दिवा शत्रूंना चकवण्यासाठी वापरण्यात येत होता, डोंगरावरून किंवा उंच ठिकाणाहून तो दिवा फेकला जात असे त्यामुळे शत्रूंना असे वाटायचे की सैनिक येत आहे. मात्र दुसऱ्या ठिकाणाहून येऊन शत्रूंवर हल्ला करून आपण युद्धही जिंकत असे असा देखील दिवा भांड यांनी संग्रहित केलेला आहे तसेच आपली संस्कृती, परंपरा आणि इतिहास आपण जपला पाहिजे तसेच पुढच्या पिढीने देखील या सर्व गोष्टी जतन करायला पाहिजे, असे देखील त्यांनी सांगितले.





