TRENDING:

मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी एका रेल्वे स्टेशनचं नाव बदललं, ऐतिहासिक स्थानकाला नवी ओळख

Last Updated:

Railway Station: महाराष्ट्रातील आणखी एका रेल्वे स्थानकांचं नाव बदलण्यात आलं आहे. गेल्या 2 वर्षांपासून या नामांतराची प्रतीक्षा होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
‎छत्रपती संभाजीनगर: कित्येक दशकांची मागणी आणि संघर्षानंतर औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. या घटनेला दोन वर्षे उलटली आणि आता रेल्वे स्थानकावरही ‘छत्रपती संभाजीनगर’ असा बोर्ड झळकला आहे. राज्य शासनाने यासंदर्भातील अधिसूचना जारी करत औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे अधिकृतपणे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामकरण केले आहे.
मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी एका रेल्वे स्टेशनचं नाव बदललं, ऐतिहासिक स्थानकाला नवी ओळख
मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी एका रेल्वे स्टेशनचं नाव बदललं, ऐतिहासिक स्थानकाला नवी ओळख
advertisement

‎2022 मध्ये शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर औरंगाबादचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर 15 सप्टेंबर 2023 मध्ये जिल्हा आणि विभागाचे नामकरणही याच नावाने करण्यात आले. आता, जवळपास दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रेल्वे स्थानकालाही नवीन ओळख प्राप्त झाली आहे.

मध्य रेल्वेचं दिवाळी गिफ्ट, सोलापुरातून धावणार जालना – तिरुचानूर विशेष रेल्वे, वेळापत्रक आणि थांबे

advertisement

‎या निर्णयासाठी खासदार डॉ. भागवत कराड यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येत केंद्राने नाव बदलास मान्यता दिली. त्यानंतर राज्य शासनाने अधिसूचना काढून प्रक्रिया पूर्ण केली.

‎आता रेल्वे स्थानकावर ‘छत्रपती संभाजीनगर’चा फलक झळकू लागल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शहर, जिल्हा आणि विभागानंतर रेल्वे स्थानकाचे नामकरण झाल्याने शहराच्या नव्या ओळखीला अधिकृत शिक्का मिळाला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनला भाव वाढ नाहीच, कांदा अन् मक्याला काय मिळाला आज दर? Video
सर्व पहा

‎इतिहासातील ‘औरंगाबाद’ या नावाचा अध्याय आता पूर्णपणे मागे पडत असून, ‘छत्रपती संभाजीनगर’ हे नाव राज्याच्या नकाशावर अधिक दृढपणे उमटले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी एका रेल्वे स्टेशनचं नाव बदललं, ऐतिहासिक स्थानकाला नवी ओळख
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल