याबाबत मिळालेली माहिती अशी की, रविवारी सायंकाळी साडेसात वाजता भराडी ते कन्नड रोडवर बोरगाव बाजार फाट्यावर घडला. गणेश रमेश निकम आणि आशिष मंगलसिंग परमेश्वर अशी मृतांची नावे आहेत. गणेश निकम हा भोकरदन येथील बंधन बँकेत, तर आशिष परमेश्वर त्याच बँकेत सिल्लोड येथे नोकरीला होता. तसेच दोघेही सिल्लोड येथे रूम भाड्याने करून राहत होते. रविवारी सुटी असल्याने दोघेही गणेशच्या घरी वासडी येथे नवीन घेतलेल्या दुचाकीने गेले होते.
advertisement
जेवण करून ते सायंकाळी परत सिल्लोडकडे निघाले. यावेळी समोर भरधाव निघालेल्या एका अज्ञात पिकअप चालकाने अचानक रस्त्यावर ब्रेक दाबले. यामुळे त्यांची दुचाकी पाठीमागून या पिकअपवर धडकली. यात गणेश आणि आशिष गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले. पिकअप चालक वाहनासह फरार झाला. दोघाही जखमींना नागरिकांनी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.