TRENDING:

Chhatrapati Sambhajiangar: भावासोबत असं कोण वागतं? आईवडिलांचं निधन, प्रॉपर्टीसाठी बहिणींचं भयंकर कांड

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: विविध बँक खाती आणि डी-मॅट खात्यांवरील नॉमिनी म्हणून असलेले भावाचे नाव परस्पर बदलले. आईच्या निधनानंतर बिंग फुटलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
छत्रपती संभाजीनगर: कुटुंबातील मालमत्तेच्या वादातून दोन सख्ख्या बहिणींनी भावाची जवळपास दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. मृत्युपत्रात फेरफार करणे, बँक आणि डी-मॅट खात्यांवरील नॉमिनी बदलणे तसेच प्लॉट विक्री करून रक्कम स्वतःकडे वळवणे असा प्रकार घडल्याची तक्रार सातारा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
Chhatrapati Sambhajiangar: भावासोबत असं कोण वागतं? आईवडिलांचं निधन, प्रॉपर्टीसाठी बहिणींचं भयंकर कांड
Chhatrapati Sambhajiangar: भावासोबत असं कोण वागतं? आईवडिलांचं निधन, प्रॉपर्टीसाठी बहिणींचं भयंकर कांड
advertisement

या प्रकरणात सुनीता दिलीप लाहोटी (रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) आणि शोभना शरद टुवानी (रा. जयपूर, राजस्थान) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी उद्योजक सुनीलकुमार हरिकिशन कलाणी (वय 64, रा. बीड बायपास) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत ही माहिती दिली आहे.

फिर्यादीनुसार, त्यांचे वडील हरिकिशन कलाणी हे मूळ सिलीगुडी (पश्चिम बंगाल) येथील व्यापारी होते. 2020 मध्ये कर्करोगामुळे त्यांचे निधन झाले. त्यांनी केलेल्या मृत्युपत्रानुसार सिलीगुडीतील मालमत्ता व बँक ठेवींचा वारस म्हणून सुनीलकुमार यांचे नाव नमूद होते. मात्र, याच कारणावरून दोन्ही बहिणींनी आजारी असलेल्या आईला जयपूर येथे नेले. त्यानंतर विविध बँक खाती आणि डी-मॅट खात्यांवरील नॉमिनी म्हणून असलेले सुनीलकुमार यांचे नाव बदलून स्वतःची नावे नोंदवून घेतल्याचा आरोप आहे.

advertisement

बीड हादरलं! दहावीच्या विद्यार्थिनीचं अपहरण, ज्वारीच्या शेतात नेलं अन्..., पीकअप चालकाच्या कृत्यानं संताप

आईचे 20 मार्च 2024 रोजी निधन झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला. एचडीएफसीच्या डी-मॅट खात्यातील सुमारे 80 लाख रुपयांचे शेअर्स बहिणींनी स्वतःच्या खात्यावर वर्ग केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच अॅक्सिस बँक आणि पंजाब नॅशनल बँकेतील प्रत्येकी 15 लाख रुपये, तर कोटक महिंद्रा बँकेतील 50 लाख रुपये नॉमिनी बदलाच्या माध्यमातून काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ग्रामीण भागातील पारंपरिक पदार्थ, सोप्या पद्धतीने बनवा गोड सांदणे, रेसिपीचा Video
सर्व पहा

याशिवाय जयपूरमधील सुशांत सिटी परिसरातील प्लॉटसंदर्भातही गैरव्यवहार झाल्याचे सांगितले आहे. आईकडून कोऱ्या अर्जांवर स्वाक्षऱ्या घेऊन संबंधित प्लॉट सुमारे 35 लाख रुपयांना विकण्यात आला आणि ती रक्कमही स्वतःकडे घेतल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. एकूण व्यवहाराची रक्कम सुमारे 1 कोटी 95 लाख रुपयांहून अधिक असल्याचा दावा करण्यात आला असून, या संपूर्ण प्रकरणाचा तपास सातारा पोलिस करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Chhatrapati Sambhajiangar: भावासोबत असं कोण वागतं? आईवडिलांचं निधन, प्रॉपर्टीसाठी बहिणींचं भयंकर कांड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल