प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हायकोर्टाच्या दिशेने सुसाट वेगात जाणाऱ्या एका कारचालकाने उड्डाणपूल चढल्यानंतर अचानक ब्रेक लावला. त्याच वेळेला अंड्याची वाहतूक करणारी लोडिंग रिक्षा (एम एच-20-डीई-4298) त्या कारच्या मागे होती. समोरील कार अचानक थांबल्याने रिक्षाचालकाने ब्रेक दाबले व ती जागेवर थांबली. मागून असलेली कार (एम एच -20-एफ यु-3498) रिक्षावर आदळली. पाठोपाठ (एम एच 06 सिएल 9846) ही कार देखील पहिल्या कारवर आदळली.
advertisement
कॉलेजला निघाले अन् काळ आडवा आला, 'त्या' घटनेत प्राध्यापकाचा जीव गेला, छ. संभाजीनगरची घटना
या अपघातात दोन्ही कारचे समोरून मोठे नुकसान झाले. शेवटच्या कारमध्ये समोरच्या सीटवर बसलेला पाच वर्षीय अभिनव गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने आकाशवाणी परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. नातेवाइकांनी मृतदेह बीड जिल्ह्यातील मूळ गावाकडे नेऊन रात्री 9 च्या सुमारास अंत्यसंस्कार केले.
अपघातानंतर तिन्ही वाहनचालक आणि त्यांचे सोबती घटनास्थळावरून निघून गेले. जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तिन्ही वाहने जप्त करून ठाण्यात जमा केली; परंतु रात्री उशिरापर्यंत कोणतीही तक्रार नोंदवली गेली नव्हती. मृत्यूबाबत माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी विविध स्थानिक आणि खासगी रुग्णालयांशी संपर्क साधला; मात्र अधिकृत नोंद मिळाली नाही, असे निरीक्षक सचिन कुंभार यांनी सांगितले. एका चिमुकल्याचा घेतलेला बळी पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करतो आहे.






