TRENDING:

काय म्हणावं या आई-बापाला? 4 महिन्यांच्या बाळासोबत असं कोण वागतं? छ. संभाजीनगरची हृदय पिळवटून टाकणारी घटना

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: या प्रकरणी अज्ञात महिलेविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर: पोटच्या मुलाला आई-वडील जीवापाड जपतात. परंतु, छत्रपती संभाजीनगरमध्ये एक संतापजनक प्रकार पुढे आला आहे. मुकुंदवाडी परिसरात सोमवारी सकाळी सुमारे 4 ते 5 महिन्यांचे अर्भक बेवारस अवस्थेत रस्त्यावर आढळले. त्यामुळे राजनगर परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी अज्ञात महिलेविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय म्हणावं या आई-बापाला? 4 महिन्यांच्या बाळासोबत असं कोण वागतं? छ. संभाजीनगरची हृदय पिळवटून टाकणारी घटना
काय म्हणावं या आई-बापाला? 4 महिन्यांच्या बाळासोबत असं कोण वागतं? छ. संभाजीनगरची हृदय पिळवटून टाकणारी घटना
advertisement

राजनगरमधील जगताप शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर, गेट क्रमांक 56 जवळ सोमवारी सकाळी सुमारे 11 वाजता हे अर्भक पडलेल्या अवस्थेत दिसून आले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक संजय बहुरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अर्भकाला ताब्यात घेऊन उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले.

जखमी मित्राचा रक्ताअभावी मृत्यू, दशक्रिया विधीला रक्तानेच श्रद्धांजली, मित्रांनी काय केलं?

advertisement

अज्ञात महिलेने अपत्याच्या जन्माची लपवणूक करण्याच्या उद्देशाने अर्भकाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. या संदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुशील रत्नपारखे करत आहेत.

View More

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
10 गुंठ्यात पिकवलं पिवळं सोनं, सात महिन्यांत लखपती, शेतकऱ्यानं कसा केला प्रयोग यशस्वी?
सर्व पहा

घटनास्थळाजवळ नाला असल्याने अर्भक तेथे फेकण्यासाठी नेले जात असताना, वाहन खड्ड्यात आदळल्यामुळे अर्भक रस्त्यावर पडले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अनुषंगाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
काय म्हणावं या आई-बापाला? 4 महिन्यांच्या बाळासोबत असं कोण वागतं? छ. संभाजीनगरची हृदय पिळवटून टाकणारी घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल