TRENDING:

देव तारी त्याला..., कंटेनरखाली सायकलचा चक्काचूर, पण वाहतूक पोलिसांनी असा वाचवला जीव...

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये कंटेनरखाली गेलेल्या सायकलचा चक्काचूर झाला. वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेमुळे एकाचा जीव वाचला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : “देव तारी त्याला कोण मारी” ही म्हण मंगळवारी पंढरपूर येथील तिरंगा चौकात एका भीषण अपघाताच्या वेळी प्रत्यक्षात अनुभवायला मिळाली. भरधाव कंटेनरखाली सायकलचा अक्षरशः चुराडा झाला. पण सायकलस्वाराचा जीव मात्र वाहतूक पोलिस आणि एका रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात वाचला.
आता महामार्गावर लागणार QR कोडचे होर्डिंग्ज, कुणाला आणि कसा फायदा? A टू Z माहिती
आता महामार्गावर लागणार QR कोडचे होर्डिंग्ज, कुणाला आणि कसा फायदा? A टू Z माहिती
advertisement

‎दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही थरकाप उडवणारी घटना घडली. वडगाव कोल्हाटी (पंढरपूर) येथील प्रल्हाद बाडगे वय 60 हे एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. कुटुंबाचा भार सांभाळणारे बाडगे मंगळवारी सकाळी सायकल दुरुस्ती करून घरी परतत होते. तिरंगा चौकात सिग्नल सुटताच बजाजनगरकडून कामगार चौकाकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर (आरजे 32 जीबी 7207) ने त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली.

advertisement

पुणे ते छत्रपती संभाजीनगर अवघ्या 3 तासांत, गेमचेंजर प्लॅन तयार, पहिल्या टप्प्याचं काम सुरू

‎धडक बसताच सायकल खाली कोसळली आणि कंटेनरच्या मागच्या चाकाखाली ते येण्यापूर्वीच तेथे ड्यूटीवर असलेले वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक कारभारी गायकवाड, इम्रान अतार, गोपाल पुरबे, उस्मान शेख तसेच रिक्षाचालकाने क्षणार्धात त्यांना बाजूला खेचले. त्याच वेळी कंटेनर पुढे निघून गेल्याने मोठा अनर्थ टळला. बाडगे किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्या सायकलचे पूर्ण नुकसान झाले आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नुसतं नाव काढलं तर तोंडाला पाणी सुटेल, आगरी स्टाईल चिकन लपेटा, अशी बनवा रेसिपी
सर्व पहा

पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार वाहतूक पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता आवाज देत सायकलस्वाराला वाचवले. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला, पोलिसांनी रस्ता मोकळा केला.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
देव तारी त्याला..., कंटेनरखाली सायकलचा चक्काचूर, पण वाहतूक पोलिसांनी असा वाचवला जीव...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल