रस्त्यात थांबवून दोघा अनोळखी तरुणांनी गयाबाई वेताळ यांना एका बनावट अनुदान योजनेबाबत माहिती देत “वृद्धांसाठी विशेष सहाय्य चालू आहे” असे सांगत विश्वासात घेतले. यानंतर आरोपींनी मोठा डाव रचत, “एका व्यक्तीला मुलगा झाल्यामुळे तो आनंद म्हणून गरीबांना पैसे देत आहे” अशी खोटी गोष्ट सांगितली.
कॉलेजला निघाले अन् काळ आडवा आला, 'त्या' घटनेत प्राध्यापकाचा जीव गेला, छ. संभाजीनगरची घटना
advertisement
विश्वास वाढवण्यासाठी त्यांनी गयाबाईंना मिनी घाटी गेटजवळील एका झाडाखाली नेले. इथे पोहोचल्यावर दुसऱ्या भामट्याने अनुदान मिळवण्यासाठी दागिने अंगावर नसणे आवश्यक असल्याचे बनाव रचत गयाबाईंना आपले 18 ग्रॅमचे मंगळसूत्र, 12 ग्रॅमचे झुंबर आणि 4 ग्रॅम अंगठी काढून पिशवीत ठेवण्यास सांगितले. भोळ्या स्वभावाच्या गयाबाईंनी सांगितल्याप्रमाणे दागिने तसेच जवळ असलेली सात हजारांची रोख रक्कम पिशवीत ठेवली.
गयाबाईंनी पिशवी बांधून घेताच आरोपीने पिशवी हातात घेऊन पळ काढला. त्यांना हे समजण्याआधीच दोघे गायब झाले होते. दागिन्यांचा आणि पैशांचा झालेला नुकसानीचा अंदाज येताच त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. वृद्धांना लक्ष्य करून अनुदान, योजना किंवा लाभाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचा बंदोबस्त करण्याची गरज असल्याचे या प्रकरणातून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.
कशी केली फसवणूक?
दागिने ठेवलेली पिशवी आरोपींनी दुसऱ्या एका पिशवीत ठेवण्याच्या बहाण्याने घेतली. काही वेळाने त्यांनी गयाबाईंच्या हातात दुसरी पिशवी देऊन त्या दोघांनी धूम ठोकली. घरी जाऊन गयाबाईंनी पिशवी उघडून पाहिले असता, दागिन्यांची आणि पैशांची मूळ पिशवी त्यात नव्हती. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि पोलिसांत धाव घेतली, याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.






