TRENDING:

सोशल मीडियाचा विषारी वापर, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडून भयंकर कांड, छ. संभाजीनगरात खळबळ

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: स्नॅपचॅटवरील स्टोरी आणि ग्रुप्सच्या मदतीने ते शहरातील हायप्रोफाइल तरुणांशी संपर्क ठेवत होते. या प्रकरणात एकूण आठ जणांची टोळी सक्रीय आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : उज्ज्वल करिअर घडवण्यासाठी उच्च शिक्षण घेणाऱ्या दोन तरुणांनी  झटपट पैसा कमावण्याच्या नादात चुकीची वाट निवडली. छत्रपती संभाजीनगरमध्ये अमली पदार्थांच्या विक्रीचं धक्कादायक रॅकेट समोर आलं आहे. शहरात विदेशी ‘हायड्रो’ गांजाची विक्री केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने राजवीर चरणसिंग बिराग (20, रा. सिडको एन-४) आणि ओम रवींद्र शिंदे (23, रा. एन-4, भगतसिंग कॉलनी) या दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून तब्बल 29 लाख 51 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल आणि 285 ग्रॅम विदेशी हायड्रो गांजा जप्त करण्यात आला.
sambhajinagarसोशल मीडियाचा विषारी वापर, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडून भयंकर कांड, छ. संभाजीनगरात खळबळ
sambhajinagarसोशल मीडियाचा विषारी वापर, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडून भयंकर कांड, छ. संभाजीनगरात खळबळ
advertisement

अटक करण्यात आलेला ओम शिंदे हा एमबीए पदवीधर आहे, तर राजवीर बिराग हा पुण्यात इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे या दोघांचेही कुटुंब सुशिक्षित व मध्यमवर्गीय आहे. त्यापैकी एका आरोपीचे वडील वकील आहेत, तर दुसऱ्याचे वडील शासकीय विभागात लिपिक म्हणून कार्यरत आहेत. कुटुंबातील तरुणांनी अमली पदार्थांच्या काळ्या बाजारात प्रवेश केल्याने शहरात आणि पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

advertisement

दारूसाठी पैसे दिले नाहीत, त्याचं डोकं फिरलं, घराला आग लावली अन् पत्नीसोबत मोठं कांड

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या शेतात लावलं 'पैशाचं पीक', 3 वर्षे नो टेन्शन, फक्त तोडायचं अन् विकायचं, कमाई किती? Video
सर्व पहा

तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. हे दोघे स्नॅपचॅट या सोशल मीडिया अॅपचा वापर करून गांजाची विक्री करत होते. या अॅपवर पाठवलेले मेसेज आणि फोटो काही वेळानंतर आपोआप नष्ट होतात, त्यामुळे पोलिसांच्या हाती पुरावे लागणार नाहीत असा त्यांचा समज होता. स्नॅपचॅटवरील स्टोरी आणि ग्रुप्सच्या मदतीने ते शहरातील हायप्रोफाइल तरुणांशी संपर्क ठेवत होते. या प्रकरणात एकूण आठ जणांची टोळी सक्रिय असल्याची माहिती समोर आली असून उर्वरित फरार आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
सोशल मीडियाचा विषारी वापर, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडून भयंकर कांड, छ. संभाजीनगरात खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल