या कार्यक्रमादरम्यान वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले असून, सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत क्रांती चौक ते गोपाल टी आणि परतीचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. ही माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील कराळे यांनी दिली.
सावधान! ई-बाईक ठरतेय जीवघेणा बॉम्ब, छ. संभाजीनगरच्या महिलेचा मृत्यू, पाहा काय घडलं?
advertisement
पर्यायी वाहतूक मार्ग
क्रांती चौकाकडून गोपाल टीकडे जाणारी वाहतूक चुन्नीलाल पेट्रोल पंपमार्गे वळवली जाईल.
गोपाल टीकडून क्रांती चौकाकडे येणारी वाहतूक संत एकनाथ रंगमंदिर आणि उत्सव चौकमार्गे नेली जाईल.
अमरप्रीत हॉटेलकडून गोपाल टीकडे जाणाऱ्यांसाठी रमानगर किंवा चुन्नीलाल पेट्रोल पंपमार्गे पर्यायी मार्ग उपलब्ध राहील.
सेशन कोर्टकडून गोपाल टीकडे जाणारी वाहतूक क्रांती चौक उड्डाणपुलाखालून यू-टर्न घेऊन चुन्नीलाल पेट्रोल पंपमार्गे वळवली जाईल.
सिल्लेखाना चौककडून येणारी वाहतूक सेशन कोर्ट किंवा चुन्नीलाल पेट्रोल पंपमार्गे वळवली जाईल.
वाहतूक शाखेने नागरिकांना आवाहन केले आहे की, अनावश्यक गर्दी टाळावी व वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, जेणेकरून वंदे मातरमच्या या कार्यक्रमाला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये.






