उन्हाळ्यापूर्वी महापालिकेला शटडाऊन घ्यायचे होते. मात्र तांत्रिक बिघाडामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला होता. मागील आठवडचात रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली तिरुपती सोसायटीजवळ नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 1100 मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येत होती. कंपनीकडून मनपाच्या 1400 मिमी व्यासाच्या जलवाहिनीला धक्का लागला. त्यामुळे थोडे लिकेज सुरु झाले. मनपा अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी पाहणी करून शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला. दुरुस्तीच्या कामाला बराच वेळ लागणार आहे.
advertisement
खान्देश आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता, मुंबईत काय स्थिती? पाहा हवामान अपडेट
आज सकाळी 11 वाजता शहराचा पाणीपुरवठा जायकवाडीतून बंद करण्यात येईल. त्यानंतर लगेच रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली दुरुस्तीचे काम सुरू होईल. नक्षत्रवाडी येथील डोंगरावर एमबीआरमध्येही काम करायचे आहे. याशिवाय फारोळा, जायकवाडी आणि अन्य ठिकाणी लहान-मोठ्या लिकेजची, विद्युत विभागाची दुरुस्ती करण्यात येईल. शुक्रवार सायंकाळपर्यंत दुरुस्तीची कामे सुरू राहणार आहेत. त्यानंतर जायकवाडीहून शहरात पाणी आणण्याचे काम सुरू राहील. शुक्रवारी रात्री सर्व जलकुंभ भरून घेऊन शनिवारी सकाळी शहराला सुरळीत पाणी पुरवठा सुरू होईल.






