TRENDING:

Chhatrapati Sambhajinagar: तुझी विकेटच काढतो..., दोन विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला, छ. संभाजीनगरमध्ये खळबळ

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: दोन विद्यार्थ्यांवर झालेल्या चाकू हल्ल्यानं छत्रपती संभाजीनगर हादरलं आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही काळापासून शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झालेली आहे. विशेषतः तरुणांमध्ये हाणामारी आणि चाकूहल्ल्यांच्या घटनांनी चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. क्षुल्लक कारण, किरकोळ वाद किंवा कधी कधी विनाकारणही हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. अशातच बेगमपुरा परिसरात पहाटेच्या सुमारास “तुमची विकेटच काढतो” अशी धमकी देत एका तरुणाने थेट दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे.
Chhatrapati Sambhajinagar: तुझी विकेटच काढतो..., दोन विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला, छ. संभाजीनर हादरलं
Chhatrapati Sambhajinagar: तुझी विकेटच काढतो..., दोन विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला, छ. संभाजीनर हादरलं
advertisement

7 नोव्हेंबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास बेगमपुरा येथील साई मंदिरासमोर ही घटना घडली. याप्रकरणी आरोपी वेदांत गणेश अभंग (रा. राम मंडपजवळ, मिटमिटा) याच्याविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

“तुझ्यासाठी पत्नीला...”, शिक्षकानं 16 वर्षीय विद्यार्थिनीसोबत नको ते केलं, छ. संभाजीनगर हादरलं

या प्रकरणी कृष्णा वसंत तायडे (रा. पांगरी, ता. सिल्लोड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. मित्र नागेश ताराचंद जावळे यांच्यासह बेगमपुरा परिसरात साई मंदिरासमोरील एका खोलीत ते भाड्याने राहतात. फिर्यादीच्या माहितीनुसार, पहाटे साडेचारच्या सुमारास ते आपल्या नातेवाईकांसह खोलीत असताना अचानक आरोपी वेदांत अभंग तेथे आला. कोणताही वाद किंवा पूर्व कारण नसताना तो आक्रमक झाला आणि “तुमची विकेटच काढतो” असे म्हणत हातातील धारदार चाकूने रमेश सुखदेव दांडगे यांच्या दंडावर वार केले. त्यानंतर त्याने कृष्णा तायडे यांच्या पोटावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र बचावासाठी त्यांनी हात पुढे केल्याने वार त्यांच्या हातावर लागला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले.

advertisement

रक्तबंबाळ अवस्थेत दोन्ही जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. विनाकारण झालेल्या या हल्ल्याने परिसरात मोठी घबराट पसरली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. आरोपीचा शोध युद्धपातळीवर घेतला जात असून, गुन्हेगारी वाढीला आळा घालण्यासाठी कडक कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Recipe: रोज नाश्त्याला पोहे खाऊन कंटाळलात? मग पोह्यांची ही रेसिपी ट्राय करा
सर्व पहा

दरम्यान, शहरात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे तरुणांमधील हिंसक प्रवृत्ती, सार्वजनिक सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था हा गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. नागरिकांकडून कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मागणी होत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Chhatrapati Sambhajinagar: तुझी विकेटच काढतो..., दोन विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला, छ. संभाजीनगरमध्ये खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल