गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा पाठ्यपुस्तक आणि वह्यांच्या किमतीमध्ये 10 ते 15 टक्क्यांनी घट झालेली आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजेच कागदाच्या किमती कमी झाल्यामुळे पाठ्यपुस्तकांच्या आणि वह्यांच्या किमती कमी झाल्या आहेत. तसेच गाईड्सच्या किमतीत देखील घट झाली आहे. पूर्वी नवनीत कंपनीची वही 60 रुपयाला यायची ती आता 55 रुपयाला येत आहे, असे अजमेरा यांनी सांगितले.
advertisement
Business Idea: 200 रुपयांमध्ये जीन्स घ्या अन् 600 रुपयांना विका! मुंबईत इथं मिळतेय सगळ्यात स्वस्त!
वह्या-पुस्तके स्वस्त
नवनीत प्रमाणे सर्वच कंपन्यांच्या वह्या स्वस्त झाल्या असून, 5 ते 7 रुपयांपर्यंत एका नगाच्या किमतीत फरक पडला आहे. वह्या-पुस्तकांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला असून, सर्व वह्या-पुस्तके खरेदी करता येणार आहेत.
इतर स्टेशनरीचे दर काय?
वह्या-पुस्तके वगळता इतर कुठल्याही शालेय साहित्याच्या किमतीत वाढ झालेली आहे किंवा त्याच्या किमती स्थिर आहेत. एक डझन वह्यांच्या मागे देखील 50 रुपयांचा फरक पडलेला आहे, असं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. पाठ्यपुस्तकांना आणि वह्याला सध्या चांगली मागणी आहे. पण शाळा सुरू झाल्यानंतर अजून ही मागणी वाढेल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शालेय साहित्यांनी दुकाने सज्ज असून, यंदा स्वस्तात वह्या-पुस्तके मिळणार असल्याने पालकांना दिलासा मिळणार आहे.