अक्षय कुमारचा गब्बर चित्रपट प्रचंड गाजला होता. ज्यात अक्षय कुमार भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची हत्या करून त्यांना भर चौकात लटकवतो. आता असाच गब्बर छत्रपती संभाजीनगरमध्ये आला आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण सोशल मीडियावर अशाच एका गब्बरचं पत्र व्हायरल होत आहे. ज्यात आपण शंभर लोकांची गॅंग तयार केली असून, लवकरच छत्रपती संभाजीनगरमधील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचं हत्याकांड करणार असल्याचा दावा या पत्रात त्याने केला आहे.
advertisement
विशेष म्हणजे हे भर चौकात करणार असल्याचा दावा देखील या पत्रात करण्यात आला आहे. स्वतःला गब्बर सांगणाऱ्या या व्यक्तीने ' रिश्वत मत लेना वरना गब्बर आ जायेगा' असा उल्लेख देखील या पत्रात केला आहे. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये या गब्बरची जोरदार चर्चा असून, हा गब्बर कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.
advertisement
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
June 12, 2024 8:56 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
छ. संभाजीनगरात 'गब्बर'ची एन्ट्री; 'भ्रष्टाचारी अधिकऱ्यांना सोडणार नाही', 100 जणांच्या गँगचा व्हायरल पत्रात दावा
