शहरात गणेश मंडळांची संख्या जवळपास 200 पर्यंत पोहोचली आहे. घरोघरी बाप्पांचे आगमन झाले आहे. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गणेशोत्सवाला इच्छुक उमेदवारांनीही चांगलाच हातभार लावला. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशीही जंगी मिरवणुका काढण्यात येतील. महापालिका प्रशासनाने चांगलीच कंबर कसली असून, यांत्रिकी विभागाकडून 46 ठिकाणी वाहने उभी केली जातील. यात भाविकांना आपली मूर्ती मनपाला दान देता येईल. ही मूर्ती मूर्तिकारांना दिली जाते. विसर्जनाच्या मूर्ती वेगळ्या ठेवल्या जातील. विधिवत मनपा मूर्तीचे विसर्जन करेल. विसर्जनस्थळी गर्दी होऊ नये, भाविकांना त्रास होऊ नये म्हणून ही सोय केली आहे.
advertisement
Pune Ganeshotsav: प्रवाशांसाठी गुड न्यूज! पुण्यातून महाराठवाड्यासह कोल्हापूर, सोलापूरला जादा बस
शहरामध्ये तब्बल 46 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र तथा मूर्ती दान केंद्र उभारले जाणार आहेत. 17 ठिकाणी विसर्जन विहीर आणि तलाव तयार करण्यात येणार आहेत. त्याशिवाय झोननिहाय कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. 3 कृत्रिम तलाव राजीव गांधी मैदान एन-7 येथे तयार केले आहेत. 4 फूट खोल 40 फूट लांब तलाव आहे.
विसर्जन विहिरी, कृत्रिम तलाव कोठे असतील?
जि. प. मैदान, एन-12, सातारा विहीर, शिवाजीनगर, संघर्षनगर, मुकुंदवाडी, पडेगाव, हर्सूल कृत्रिम तलाव, शहानुरमियाँ दर्गा कृत्रिम तलाव, 3 देवळाई विसर्जन तलाव, एन-7 राजीव गांधी मैदान, चिकलठाणा कृत्रिम तलाव, देशमुखनगर कृत्रिम तलाव, सातारा, पडेगाव येथेही कृत्रिम तलाव.
मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी मोठे कृत्रिम तलाव नकोत, अशी सूचना केली. त्याऐवजी छोटे-छोटे कृत्रिम तलाव तयार करावेत, असे सर्व वॉर्ड अभियंत्यांना सूचित केले आहे.






