दररोज एका गायीच्या चारापाणी, देखभालीसाठी सरासरी 200 रुपयांहून अधिक खर्च येतो. मात्र, सध्याच्या परिस्थितीत तो खर्च उचलणे कठीण झाले आहे. जिल्ह्यात सध्या 33 मान्यताप्राप्त गोशाळा असून, त्यामध्ये सुमारे 1 हजार 802 गायी आहेत. यापैकी बहुतांश गायी वयोवृद्ध आणि कामासाठी अयोग्य आहेत.
3 ते 4 लाख उत्पन्न देणारा बिजल्या, शेतकऱ्याने 11 लाखांना का विकला?
advertisement
राज्य गोसेवा आयोगाच्या माध्यमातून देशी गायींसाठी प्रतिदिन प्रती गाय 50 रुपये अनुदान देण्यात येते. पण हे अनुदान गेल्या काही महिन्यांपासून मिळालेले नाही. त्यामुळे गोशाळाचालकांना आपले गोधन जिवंत ठेवण्यासाठी वैयक्तिक खर्च आणि थोड्याफार देणग्यांवरच अवलंबून राहावे लागत आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सचिदानंद साखरे यांनी सांगितले की, “राज्यातील 66 जिल्ह्यांतील एकूण 330 मान्यताप्राप्त गोशाळांचे थकीत अनुदान लवकरच वितरित केले जाणार आहे.”
चिकलठाणा येथील गोशाळाचालक मनोज बोरा (मामाजी) यांनी सांगितले की, “आम्ही वारंवार प्रस्ताव पाठवूनही अजूनपर्यंत एक रुपयाचेही अनुदान मिळाले नाही. गायींच्या चारापाण्याचा सारा खर्च आम्हाला दानशूरांच्या मदतीवरच भागवावा लागतो.” महागाई, थकलेले अनुदान आणि घटती देणगी या तिहेरी संकटात सापडलेल्या गोशाळा आज अक्षरशः जगण्यासाठी झटत आहेत.






