राष्ट्रध्वजाचा अपमान केला तर आपल्याला कायद्याअंतर्गत ही शिक्षा होतेच पण त्यासोबतच आपण राष्ट्रध्वज फडकवताना काय काळजी घेतली पाहिजे तर त्यामध्ये सर्वप्रथम 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन्ही दिवशी राष्ट्रध्वज फडकवण्याचे नियम वेगवेगळे आहेत. 15 ऑगस्ट रोजी जेव्हा आपण राष्ट्रध्वज फडकवतो तेव्हा तो अर्ध्यावर नेल्यानंतर फडकावा आणि नंतर वरती न्यावा.
advertisement
26 जानेवारी रोजी जेव्हा आपण राष्ट्रध्वज हा संपूर्ण वरती गेल्यानंतरच तो फडकवला गेला पाहिजे. जे शासकीय अधिकारी आहेत त्यांनीच राष्ट्रध्वजाला सॅल्यूट केला पाहिजे. त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही याला सॅल्यूट करता कामा नये असं कायद्यात सांगितलेलं आहे. असं भारतीय ध्वज संहिता सांगते, असं ॲडव्होकेट अनघा पेडगावकर सांगतात.
त्यासोबतच जळलेला, फाटलेला किंवा इतर काही झालेला राष्ट्रध्वज हा आपण फडकवता कामा नये. राष्ट्रध्वज फडकवताना आपण सर्वांनी अगदी आदरपूर्वक त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. राष्ट्र गौरव अपमान निवारण अधिनियमांतर्गत आपल्याला शिक्षा होत असते. या नियमांतर्गत जर कोणी लष्करी अधिकारी सोडून इतर कोणीही जर राष्ट्रध्वज प्रदान केला तर ते शिक्षेस पात्र असतात.
त्यासोबतच बिल्डिंगला कव्हर केला असेल किंवा गाडीला जर तुम्ही राष्ट्रध्वज कव्हर केला असेल तर हे देखील शिक्षेस पात्र असतात. किंवा तुम्ही पायाखाली राष्ट्रध्वज तुडवला किंवा अपमानास्पद भाषा राष्ट्रध्वजासाठी वापरली तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते. भारतीय संविधानातील कलम दोन अंतर्गत तुम्हाला शिक्षा होऊ शकते आणि त्यासाठी तुम्हाला दंड देखील आकारण्यात येऊ शकतो, असं ॲडव्होकेट अनघा पेडगावकर यांनी सांगितलं.