संभाजीनगरमधील कृष्णभक्तांकडून शहरातील विविध 53 ठिकाणी दहीहंडी फोडण्यात येणार आहे. गतवर्षी शहरात नोंदणीकृत 44 मंडळांनी दहीहंडी व कृष्णजन्मोत्सव साजरा केला होता. यंदा यामध्ये वाढ झाली असून सोमवारपर्यंत पोलिसांकडे 53 मंडलांनी नोंदणी केली आहे. तसेच 11 मंदिरांमध्येही कृष्ण जन्माष्टमी सोहळा होत आहे.
गोकुळाष्टमीची सर्व खरेदी करा एकाच ठिकाणी, छत्रपती संभाजीनगरमधील बेस्ट मार्केट, VIDEO
advertisement
6 चौकातील दहीहंडी आकर्षण
संभाजीनगर शहरतील 6 प्रमुख चौकात पारंपरिक उत्सव असतो. प्रमुख आकर्षण असलेल्या गुलमंडी, कॅनॉट प्लेस, टीव्ही सेंटर, शहागंज, निराला बाजार, गजानन महाराज मंदिर चौकात जवळपास 12 ते 15 हजार नागरिक एकत्र येतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे दुपारी 4 ते 11 पर्यंत या परिसरातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच कोणते गोविंदा पथक यंदा 8 किंवा 9 थर रचून मानाची दहीहंडी फोडते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
कृष्ण जन्माष्टमीला घराच्या घरी बनवा गोपाळकाला, 5 मिनिटांमध्ये तयार होणारी रेसिपी
हे मार्गे असतील बंद
• टीव्ही सेंटर चौक : साक्षी मंगल कार्यालय ते टीव्ही सेंटर चौक, हडको कॉर्नर ते टीव्ही सेंटर, जिजाऊ चौक ते टीव्ही सेंटर, आयपी मेस ते टीव्ही सेंटर
• कॅनॉट प्लेस : कॅनॉट प्लेसकडे जाणारे सर्व मार्ग बंद राहतील.
• गजानन महाराज मंदिर चौक: पटियाला बँक, जवाहरनगर पोलिस ठाण्यासमोरील आदिनाथ चौक, त्रिमूर्ती चौक, सेव्हन हिल्स उड्डाणपूल ते गजानन महाराज मंदिर.
• कोकणवाडी चौक: पंचवटी चौक, विट्स हॉटेल, एसएससी बोर्ड व जिल्हा न्यायालय ते कोकणवाडी चौक.
• गुलमंडी : पैठण गेट, औरंगाबाद बुक डेपो, बाराभाई ताजिया, सिटी चौक, औरंगपुरा ते बाराभाई ताजिया.
दरम्यान, वरील रस्ते वगळता शहरातील अन्य मार्गांवरून वाहतूक सुरू असेल. त्यामुळे नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा.