TRENDING:

मुंबई-छ. संभाजीनगर विमान सेवेबाबत मोठं अपडेट, वेळापत्रक अन् लोकेशन बदललं, आता कुठून झेपावणार?

Last Updated:

Chhatrapati Sambhajiangar Flight: उन्हाळी वेळापत्रक लागू झाल्यानंतर सायंकाळची फ्लाइट नवी मुंबई विमानतळावरून चालवली जाणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
‎छत्रपती संभाजीनगर : मुंबई–छत्रपती संभाजीनगर-मुंबई मार्गावरील विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाचा बदल होणार आहे. इंडिगोची सायंकाळची फ्लाइट येत्या 29 मार्चपासून नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण घेणार असून ऑनलाईन आरक्षण प्रणालीतही त्यानुसार बदल करण्यात आला आहे. या बदलासोबत मुंबईच्या उड्डाण वेळापत्रकातही काही प्रमाणात फेरफार होणार असल्याचे माहिती आहे.
मुंबई-छ. संभाजीनगर विमान सेवेबाबत मोठं अपडेट, वेळापत्रकच नव्हे, तर लोकेशनच बदललं, आता कुठून झेपावणार?
मुंबई-छ. संभाजीनगर विमान सेवेबाबत मोठं अपडेट, वेळापत्रकच नव्हे, तर लोकेशनच बदललं, आता कुठून झेपावणार?
advertisement

‎सध्या इंडिगो या मार्गावर सकाळी आणि सायंकाळी अशा दोन वेळा विमानसेवा देते. दोन्ही फ्लाइट्स सध्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चालवल्या जात आहेत. मात्र उन्हाळी वेळापत्रक लागू झाल्यानंतर सायंकाळची फ्लाइट नवी मुंबई विमानतळावरून चालवली जाणार आहे.

तुमच्या कारमध्ये कितीही हायटेक फिचर्स असेल तरही गाडी होते हॅक, मग काय करावं?

advertisement

मुंबई शहर आणि उपनगरांतून नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी सध्या प्रवाशांना मोठा वेळ द्यावा लागतो आणि प्रवास तुलनेने किचकट ठरतो. आवश्यक रस्ते, उड्डाणपूल तसेच महानगर रेल्वेची कामे पूर्ण होईपर्यंत सायंकाळची सेवा तेथे हलविणे म्हणजे नियमित प्रवाशांवर अतिरिक्त ताण टाकण्यासारखे आहे. त्यामुळे ‎या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी होत आहे.

‎या मार्गावरील विमानसेवा अनेक वर्षांपासून प्रवाशांसाठी सोयीची ठरली असून व्यावसायिक, विद्यार्थी आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात या सेवेचा वापर करतात. त्यामुळे प्रवाशांचा विचार करून इंडिगोने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. ‎“उन्हाळी वेळापत्रक लागू होण्यापूर्वी सकारात्मक निर्णय होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे,” असे ‘एटीडीएफ’च्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी सांगितले.

advertisement

‎मुंबई सकाळचे वेळापत्रक

‎मुंबईचे सकाळचे विमान सध्या मुंबईहून सकाळी 6:10 वाजता निघून 7:20 वाजता शहरात येते. हे विमान 29 मार्चपासून मुंबईहून पहाटे 5:35 वाजता उड्डाण घेईल आणि 6:45 वाजता शहरात येईल. परतीच्या प्रवासात सध्या हे विमान शहरातून सकाळी 7:50 उड्डाण घेते आणि 8:45 वाजता मुंबईत पोहोचते. नव्या वेळापत्रकानुसार हे विमान सकाळी 7:15 वाजता उड्डाण घेईल आणि 8:15 वाजता मुंबईत पोहोचेल.

advertisement

‎सायंकाळचे वेळापत्रक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोन्यापेक्षा भारी, कोरियन ज्वेलरी; 30 रुपयांपासून खरेदी, मुंबईतलं होलसेल मार्केट
सर्व पहा

‎मुंबईचे सायंकाळचे विमान सध्या मुंबईहून सायंकाळी ७:३५ वाजता निघून 8:45 वाजता शहरात येते. हे विमान 29 मार्चपासून मुंबईहून सायंकाळी 7:30 वाजता निघून 8:24 वाजता शहरात येईल. परतीच्या प्रवासात सध्या हे विमान शहरातून रात्री 9:15 उड्डाण घेते आणि रात्री 10:10 वाजता मुंबईत पोहोचते. नव्या वेळापत्रकानुसार हे विमान रात्री 8:55 वाजता उड्डाण घेईल आणि रात्री 9:50 वाजता मुंबईत पोहोचेल.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मुंबई-छ. संभाजीनगर विमान सेवेबाबत मोठं अपडेट, वेळापत्रक अन् लोकेशन बदललं, आता कुठून झेपावणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल