हिंदू महिला सौभाग्य प्रतीक म्हणून सिंदूर कपाळी लावतात. खरा सिंदूर हा सिंदूर किंवा कुंकुम वृक्षाच्या फळांच्या टरफल व खोडापासून निर्माण केला जायचा. राजांचे व ऋषीं- मुनी यांचे भगवे रेशमी कापड बनवण्यासाठी या झाडापासून निर्मित केशरी नैसर्गिक रंगाचा वापर होत असे. मात्र ही झाडे हळूहळू कमी होत गेली व त्या ऐवजी रासायनिक सिंदूर प्रचलनात आला.
advertisement
Pune: मुस्लिम लग्नात शुभमंगल सावधान! हिंदू जोडप्याने बांधली लग्नगाठ, पुण्यातील आदर्श घटना
सिंदूरची चाळीसहून अधिक वयाची तीनच झाडे छत्रपती संभाजीनगरमधील बहुली ते चिंचपूर शिवारात खेळणा नदीकाठी आहेत. या वृक्षाच्या बिजापासून सिल्लोड येथील पर्यावरण संवर्धक डॉ. संतोष पाटील यांनी काही रोपं बनवली आहेत. या रोपांचे शहीद जवान व पहलगाम येथे मृत पावलेल्या देश बांधवांच्या स्मृतीप्रित्यर्थ रोपण करण्यात आले. केळगाव येथील शहीद संदीप जाधव यांच्या स्मारकाजवळ वीरमाता विमल जाधव, डॉ. पाटील, गणेश चाथे व जाधव, सेवानिवृत्त सैनिकांच्या हस्ते ही सिंदूरची रोपे लावली.
या वृक्षाच्या फळांच्या शेंदुरी रंगाच्या टरफलावर असलेल्या तंतुना खाऊन (फायबर) मॅन फेस बग हा मानवी चेहऱ्या सारखा दिसणारा कीटक उपजीविका करतो. उन्हाळ्यात पक्व होणारी ही फळं खाण्यासाठी हा सुंदर कीटक या झाडावर अधिवास करतो. माकडेही हे बीज आवडीने खातात. अनेक जातीच्या मुंग्याही या फळाची बीज कुरतडून खातात. 'मॅन फेस बग' या कीटकास मानसासारखे दोन्ही बाजूस दोन डोळे, मध्ये नाक व ओठ, डोके असा त्याचा आकार असून कापसा सारखे तंतुमय घटक खाण्यास तो प्राधान्य देतो, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.
वृक्षारोपण भारत मातेस समर्पित
भारत मातेच्या ललाटी हे वृक्ष सौभाग्य कायमच असावे, जैवविविधता जोपासली जावी म्हणून ही दुर्मिळ होत असलेली सिंदूर वनस्पती लावली आहे. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव 'मेलोटस फिलीपेन्सिस' असे आहे, ती झाडे आम्ही जतन केली आहेत व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षांनिमित्ताने दहा ठिकाणी नव्याने रोपणही करत आहोत, असे जैवविविधता संवर्धक डॉ. संतोष पाटील यांनी सांगितले.





