छत्रपती संभाजीनगर : राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि आज 23 नोव्हेंबरला त्याचा निकाल जाहीर झाले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्य मतदार संघामधील आमदार प्रदीप जयस्वाल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. 8119 मतांनी त्यांनी लीड घेऊन हा विजय मिळवलेला आहे. या निवडणुकीत त्यांनी एआयएमआयएमचे नासिर सिद्दिकी आणि उद्धव ठाकरे गटाचे बाळासाहेब थोरात यांचा पराभव करून हा विजय मिळवलेला आहे. त्यांच्या या विजयानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांच्या सून म्हणाल्या की, प्रदीप जयस्वाल साहेबांनी जनतेसाठी खूप काम केलेली आहेत. त्यामुळे त्यांना सर्व जनतेने निवडून दिले आहे आणि आम्हाला खूप जास्त आनंद होतो आहे की आमचे पप्पा निवडून आलेले आहेत. तसेच प्रदीप जयस्वाल यांनी खूप चांगली काम केलेले आहेत आणि सकाळपासून मनात धाकधूक होती की, कसं होईल. पण खात्री मात्र होते की, जयस्वाल साहेबच निवडून येतील आणि त्यामुळे खूप आनंद होतोय, असे त्यांचे मोठे बंधू म्हणाले.
दरम्यान, माझे आजोबा निवडून आले आहेत. याचा मला खूप आनंद आहे आणि इथून पुढे देखील तेच असेच निवडून येत राहतील आणि त्यांनी मंत्री व्हावे अशी देखील माझी इच्छा आहे, असे त्यांचा नातू म्हणाला. साहेबांनी जनतेसाठी खूप कामे केलेली लाडकी बहीण सारखी योजना आणली त्याचबरोबर शहरांमधील अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावलेल्या आहेत. पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न या सर्व कामांमुळे जनतेने त्यांना निवडून दिलेला आहे. आणि इथून पुढे देखील राहिलेले सगळेच कामे ते पूर्ण करतील, असा आम्हाला विश्वास आहे, या शब्दात त्यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली.
छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्य मतदारसंघातून प्रदीप जयस्वाल यांनी 8119 मतांच्या आघाडीने विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयामुळे संपूर्ण मतदारसंघात उत्साहाचे वातावरण आहे. या निवडणुकीत जयस्वाल यांच्यासमोर एमआयएमचे नासीर आणि राष्ट्रवादीचे बाळासाहेब थोरात हे प्रमुख प्रतिस्पर्धी होते. मात्र, जयस्वाल यांनी दोघांनाही पराभूत करून आपला विजय नोंदवला.