हैदराबाद–हडपसर विशेष रेल्वे
हैदराबाद ते हडपसर दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे.
गाडी क्र. 07167 : हैदराबादहून 7 डिसेंबर रोजी रात्री 8.25 वाजता सुटणार असून, 8 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजता हडपसरला पोहोचेल. छत्रपती संभाजीनगर येथे ती सकाळी 6.15 वाजता दाखल होईल.
गाडी क्र. 07168 : हडपसरहून 8 डिसेंबरला संध्याकाळी 7 वाजता हैदराबादच्या दिशेने प्रस्थान करेल. या गाडीमध्ये 23 डब्यांची रचना असून, प्रवाशांना पुरेशा जागेची उपलब्धता राहणार आहे.
advertisement
मुंबई आणि शिर्डीसाठीही विशेष सेवा
हैदराबाद–लोकमान्य टिळक टर्मिनस मार्गावरही एक विशेष फेरी (गाडी क्र. 07150 आणि 07151) 6 डिसेंबरला चालवली जाणार आहे. यामुळे मराठवाड्यातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त पर्याय उपलब्ध होईल.
तिरुपती–साईनगर शिर्डी साप्ताहिक रेल्वे
शिर्डीसाठी प्रवास करणाऱ्यांसाठी तिरुपती–साईनगर शिर्डी या मार्गावर नवी साप्ताहिक गाडी (क्र. 07425) 9 डिसेंबरपासून सुरू होत आहे. ही सेवा दर मंगळवारी दुपारी 12.55 वाजता तिरुपतीहून सुटेल आणि परभणीमार्गे छत्रपती संभाजीनगर येथे ठरावीक थांबा घेऊन पुढे शिर्डीकडे धावेल.
दक्षिण मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे मराठवाड्यातील लाखो प्रवाशांना अधिक पर्याय, सोयीस्कर वेळापत्रक आणि थेट मार्गांचे लाभ मिळणार आहेत.






