छत्रपती संभाजीनगर : गोकुळाष्टमी हा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गोकुळाष्टमी म्हटलं की सर्वत्र आनंद उत्सवाच वातावरण असते. जर तुम्हाला गोकुळाष्टमी साठी खरेदी करायची असेल तर त्यासाठी सर्व साहित्य हे संभाजीनगरमधील बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
गोकुळाष्टमी सण अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील गुलमंडी या परिसरामध्ये तुम्हाला गोकुळाष्टमी साठी लागणारे सगळे साहित्य हे उपलब्ध झाले आहे. या ठिकाणी तुम्हाला लहान मुलांसाठी लागणारे जे कपडे आहेत, ते देखील उपलब्ध आहेत. यामध्ये दहीहंडीसाठी लागणारे टी-शर्ट, तसेच या टी-शर्ट वरती कृष्णाचा फोटो, तसेच काही वाक्य लिहिलेले आहे. अशा प्रकारचे टी-शर्ट या ठिकाणी उपलब्ध आहेत.
advertisement
या टी शर्टची किंमत 100 रुपयांपासून सुरू होतात. बाळ कृष्णाचा श्रृंगार करण्यासाठी लहान मुलांना लागणारे सर्व साहित्य याठिकाणी उपलब्ध आहे. त्यामध्ये लहान मुलांचे ड्रेस उपलब्ध आहेत. जन्मलेल्या बाळापासून ते मोठ्या मुलांपर्यंतचे ड्रेसही या ठिकाणी वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहेत. लहान मुलांच्या या ड्रेसच्या किंमती दीडशे रुपयांपासून आहेत.
त्यासोबतच या ठिकाणी तुम्हाला दहीहंडी, बासरी, लहान मुलांसाठी लागणारा सर्व श्रृगांराचे साहित्य, त्यामध्ये सर्व दागिने देखील उपलब्ध आहेत. तसेच मुलींसाठी देखील राधाचा ड्रेस या ठिकाणी उपलब्ध आहेत. 200 रुपयांपासून मुलींच्या ड्रेसच्या किमती या ठिकाणी सुरू होतात. तसेच पूजेसाठी लागणार साहित्य देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. यामध्ये सर्व लागणारे साहित्य तर आहेच पण त्यासोबत त्या ठिकाणी तुम्हाला जन्माष्टमीसाठी लागणारा प्रसाददेखील उपलब्ध आहे.
कृष्णाला सजवण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र, टोप, बासुरी, मोरपीस हे सर्व साहित्य देखील उपलब्ध आहे. कृष्णासाठी लागणारे सर्व प्रकारचे ड्रेस या ठिकाणी उपलब्ध आहेत. अगदी 10 रुपयांपासून या ठिकाणी कृष्णासाठी लागणारा ड्रेसच्या किमती आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे टोप देखील उपलब्ध आहेत.
बाप्पाच्या मूर्तीला कस्टमाईझ ज्वेलरी बनवून घ्यायचीये?, तर मग पुण्यातील हे ठिकाण आहे एकच नंबर, VIDEO
त्यासोबतच या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारचे पाळणे देखील भेटून जातील. 70 रुपयांपासून या पाळण्यांच्या किमती या ठिकाणी आहेत, अशा प्रकारचे सर्व साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे, असे येथील विक्रेत्यांनी सांगितले. तुम्हालाही याप्रकारचे साहित्य खरेदी करायचे असेल तर तुम्ही अगदी स्वस्त दरात गुलमंडी या ठिकाणी जाऊन हे साहित्य खरेदी करू शकता.