प्रामुख्याने शनिवारी भद्रामारुतीला हजारोंच्या संख्येने रस्त्याने पायी जाण्याची प्रथा आहे. शिवाय, सोमवारी वेरुळ येथील तीर्थकुंडातून पाणी कावडीद्वारे विविध ठिकाणी पायी घेऊन जातात. त्या पार्श्वभूमीवर शहर तसेच वाहतूक पोलिसांनी या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीत मोठे बदल केले आहेत.
Aajache Rashibhavishya: चिंता नाहीशी होईल, गुंतवणुकीचा फायदा होणार, 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?
advertisement
वेरुळच्या दिशेने जाणाऱ्या सर्व मार्गावर 26 जुलै ते 23 ऑगस्ट दरम्यान सर्व प्रकारची जड वाहतूक बंद करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. तर प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी 6 ते शनिवारी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत दौलताबाद टी पॉईंट ते खुलताबादच्या दिशेने जाणारा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार असल्याचे शहर वाहतूक विभागाकडून सांगितले आहे.
वेरूळ आणि खुलताबादला जाण्यासाठी हा असेल पर्यायी मार्ग
छत्रपती संभाजीनगरकडून नाशिक, धुळ्याकडे जाणारी जड, मध्यम वाहने भगवान महावीर चौक (बाबा चौक), नगरनाका, एस. एस. क्लब, करोडीमार्गे सोलापूर-धुळे महामार्गावरून जांभाळा कसाबखेडा फाटा वेरुळमार्गे येतील आणि जातील. तर नाशिक, धुळ्यावरून शहरात येणारी मध्यम आणि जड वाहने कसाबखेडा फाटा, करोडी, एस.एस. क्लबमार्गे सरळ शहरात येतील.
खुलताबाद मार्ग या तारखांना बंद
25 जुलै ते 23 ऑगस्ट या काळात प्रत्येक शुक्रवारी सायं. 6 ते शनिवारी रात्री 1 वाजेपर्यंत नगरनाका ते दौलताबाद टी पॉईंटमार्गे मध्यम आणि जड वाहनांसाठी बंद राहील. तर दौलताबाद टी पॉईंट ते दौलताबाद घाटमार्गे पुढे खुलताबादच्या दिशेचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असणार आहे.
वेरूळच्या मार्गांत बदल (मध्यम व जड वाहने)
कन्नडकडून येणारी वाहने कसाबखेडा फाटा, वरझडी, माळीवाडा, शरणापूर फाट्यावरून छत्रपती संभाजीनगरकडे येतील. तर धुळ्याकडून येणारी वाहने धुळे, शिवूर, देवगाव कसाबखेडा फाटामार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येतील. छत्रपती संभाजीनगर, शरणापूर फाटा, माळीवाडा वरझडी, कसाबखेडा फाटामार्गे कन्नडकडे जातील. तर धुळ्याकडे जाणारी वाहने कसाबखेडा फाटा, देवगाव रंगारी शिवूरमार्गे पुढे जातील.
फुलंब्रीकडून कन्नडकडे जाणारी वाहतूक छत्रपती संभाजीनगर, शरणापूर फाटा, माळीवाडा, वराडी कसाबखेडा फाटामार्गे कन्नडकडे जाईल. तर फुलंब्रीकडून धुळ्याकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर, कसाबखेडा फाटा, देवगाव रंगारी शिवूरमार्गे पुढे जातील.
तर अशा पद्धतीने या मार्गामध्ये बदल करण्यात आलेला आहे तरी सर्वांनी याची दखल घ्यावी आणि सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आणि प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.