शहरामध्ये 953 ठिकाणी सार्वजनिक गणपती स्थापन करण्यात आलेले आहेत. विसर्जन मिरवणुकीसाठी 4 पोलीस उपआयुक्तांसह 6 सहाय्यक पोलीस आयुक्त, 36 पोलीस निरीक्षक, 150 सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, 2450 पुरुष अंमलदार आणि 350 महिला अंमलदार असणार आहेत. त्यासोबतच एसआरपीएफच्या 3 सशस्त्र जवानांच्या तुकड्या यासाठी सज्ज करण्यात आलेल्या आहेत. बाहेरील 5 पोलीस निरीक्षक, 40 सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षकांसह पाचशे अंमलदार, 1 एसआरपीएफ आणि 500 होमगार्ड असणार आहेत.
advertisement
शहरामधील 21 संवेदनशील ठिकाणांवर सशस्त्र 21 अधिकारी आणि 84 अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. शहरात 17 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 74 ठिकाणी फिक्स पॉईंट 231 अंमलदार करण्यात आलेले आहेत. 16 ड्रोनद्वारे आकाशातून नजर ठेवण्यात येणार आहे. याकरिता 123 अंमलदार आवाक मापक यंत्राद्वारे आवाजाची तपासणी करतील. पैठण गेट, शहागंज, सिटी चौक, बाराभाई ताजिया, राजा बाजारचा वॉच टॉवर्स असणार आहेत.
उद्या सकाळी 7 ते मिरवणूक संपेपर्यंत खालील मार्ग बंद
मुख्य मिरवणुकीचा मार्ग संस्थान गणपती ते सिटीचौक, गुलमंडी, बाराभाई ताजिया ते जिल्हा परिषद मैदान.
संस्थान गणपती ते शहागंज चमन, गांधीपुतळा, सिटीचौक, जुनाबाजार मार्ग भडकलगेट
जिन्सी चौक ते संस्थान गणपती, जाफरगेट, मोंढा ते राजाबाजार
निजामोद्दीन दर्गा रोड ते शहागंज चमन
भुरे पहेलवान यांचे घर ते निजामोद्दीन चौक व उजवीकडे शहागंज चमनपर्यंत.
चेलीपुरा चौक ते गांधी पुतळा, मंजूरपुरा चौक ते गांधीपुतळा
लोटाकारंजा ते सराफा, रोहिला गल्ली
बुढीलेन, जुने तहसील कार्यालय, वारुदनगरनाला.
सिल्ललेखाना चौक, पैठणगेट ते सिटीचोक.
सावरकर चौक ते बळवंत वाचनालय चौक.
अंजली टॉकीज, महात्मा फुले चौक ते काळे चौक.
रॉक्सी कॉर्नर ते बाबूराव काळेचौक.
विहीर
निराला बाजार रोड बंद
पर्यायी मार्ग
शहागंजकडे जाण्यासाठी सिटी मिलकॉर्नरकडून औरंगपुऱ्याकडे येणारी वाहने अंजली टॉकीजजवळून उजवीकडे नागेश्वरवाडी, समर्थनगरमार्गे; तसेच अंजली टॉकीजपासून डावीकडे खडकेश्वर, मनपामार्गे जातील. क्रांती चौकाकडून येणारी सर्व वाहने सिल्लेखाना चौक, समर्थनगर चौक मार्ग बसस्थानकाकडे जातील.
नवीन संभाजीनगर
सिडको-हडको, गजानन महाराज मंदिर परिसरातील बंद मार्ग चिश्तिया चौक-बजरंग चौक ते बळीराम पाटील शाळा चौक, ओंकार चौक ते पार्श्वनाथ चौक, टीव्ही सेंटर चौक ते एन 12 स्वर्ग हॉटेलजवळील विहिरीपर्यंत तसेच जिजाऊ चौक ते शरद टी एन-1 चौक आणि चिश्तिया चौक सेव्हन हिल्स ते शिवाजीनगर, त्रिमूर्ती चौक ते गजानन महाराज मंदिर, पतियाळा बँक ते गजानन महाराज मंदिर.
सिडको भाग
चिश्तीया चौक ते बळीराम पाटील शाळा, ओंकार चौक ते सिडको पोलिस स्टेशन मार्ग-टी.व्ही. सेंटर चौक ते एन-12 विसर्जन विहीर..
चांदणे चौक, जिल्हाधिकारी कार्यालय टी.व्ही. सेंटर रस्ता.
एन 1 चौक ते सेंट्रल नाका तसेच चिश्तिया चौक.
सेव्हनहिल ते शिवाजीनगर, त्रिमूर्ती चौक ते गजानन महाराज मंदिर.
सिडको, गारखेड्यातील पर्यायी मार्ग
सेंट्रल नाका आणि चिश्तिया चौकाकडून एन-1 चौक आणि टीव्ही सेंटरकडे जाणारी वाहने मणियार चौक, द्वारकादास शामकुमार साडी सेंटर, जीएसटी कार्यालय, व्हीआयपी मराठा हॉटेल, एसबीआय बँकमार्गे किंवा सेव्हन हिल्स, हायकोर्ट सिग्नल, जळगाव टी पॉइंट, एन-1 चौक, वोक्हार्ट टी, आंबेडकर चौक, शरद टी, हर्सल टी, जटवाडा टी, हडको कॉर्नरमार्गे जातील व येतील, जिल्हाधिकारी कार्यालय ते गणेश कॉलनीमार्गे टीव्ही सेंटरकडे जाणारी वाहतूक उद्धवराव पाटील चौक, हडको कॉर्नरमार्गे वळवली आहे. पतियाळा बँक ते गजानन महाराज मंदिर चौकाकडे येणारी वाहने, हिंदू राष्ट्र चौक, विजयनगर, गजानन कॉलनी, रिलायन्स मॉलमार्गे जातील आणि येतील. जवाहरनगर ठाणे ते गजानन महाराज मंदिराकडे येणारी वाहने, डॉ. हेडगेवार हॉस्पिटल पाठीमागील रोडने त्रिमूर्ती चौकाकडे जातील आणि येतील.
त्रिमूर्ती चौक ते गजानन महाराज मंदिराकडे येणारी वाहने, डॉ. हेडगेवार हॉस्पिटलच्या पाठीमागील रोड, माणिक हॉस्पिटल, जवाहरनगर पोलिस ठाण्यामार्गे जातील व येतील. सेव्हन हिल्स उड्डाणपुलाकडून गजानन महाराज मंदिराकडे येणारी वाहने जालना रोडने आकाशवाणीमार्गे जातील.