अंशतः रद्द होणाऱ्या गाड्या
दौंड–निजामाबाद (क्र. 11409) : 2, 3, 4, 5, 7 आणि 8 जानेवारी रोजी अंशतः रद्द. गाडी छत्रपती संभाजीनगर ते मुदखेडच धावेल. मुदखेड–निजामाबाद मार्ग रद्द.
निजामाबाद–पंढरपूर (क्र. 11413) : 3, 4, 5, 6, 8 आणि 9 जानेवारी रोजी निजामाबाद–मुदखेड दरम्यान अंशतः रद्द.
पूर्णपणे रद्द गाड्या
निजामाबाद–नांदेड (77645) : 3 ते 9 जानेवारी — पूर्ण रद्द
advertisement
नांदेड–निजामाबाद (77646) : 3 ते 9 जानेवारी — पूर्ण रद्द
पुणे-मुंबई रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: 11 दिवस वेळापत्रक विस्कळीत, तपासा नव्या वेळा
वेळापत्रक बदल आणि नियमन
विशाखापट्टणम–नांदेड (20821) आणि काचिगुडा–नरखेर (17641) : पुनर्नियोजन आणि नियमन.
उशिराने धावणाऱ्या गाड्या
मुंबई–लिंगमपल्ली (17057) : 3 जानेवारी — 50 मिनिटे उशीर
काचिगुडा–नगरसोल (17661) : 4 जानेवारी — नगरसोल आगमनात 2 तास उशीर
नगरसोल–काचिगुडा (17661) : 8 व 9 जानेवारी — नगरसोलहून सुटण्यात 1 तास उशीर
नांदेड–मेडचल (77606) : 3 ते 9 जानेवारी — तब्बल 3 तास विलंब
भगत की कोठी–काचिगुडा (17606) : 2 जानेवारी — नांदेड विभागात 2 तास उशीराने धावेल
या लाइन ब्लॉकदरम्यान प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करताना सुधारित वेळापत्रकाचा अवश्य विचार करावा, असा सल्ला रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
लोणावळा-कल्याण रेल्वे विभागात 'पॉवर ब्लॉक -
लोणावळा-कल्याण रेल्वे विभागात 'पॉवर ब्लॉक' घेण्यात येणार असल्याने पुणे आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार आहे. 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत रेल्वे मार्गावरील प्री नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामांसाठी हा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. या कामामुळे पुणे, मुंबई आणि अन्य राज्यांतून ये-जा करणाऱ्या अनेक एक्स्प्रेस गाड्यांना उशीर होणार असून, काही लोकल गाड्या निश्चित स्थळाच्या अलीकडेच थांबवण्यात येणार आहेत.
