छत्रपती संभाजीनगर शहराला अधिक सक्षम आणि सातत्यपूर्ण पाणीपुरवठा मिळावा यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान 2500 मिमी व्यासाच्या जलवाहिनीची जोडणी केली जात आहे. हे काम यापूर्वी करण्यात येणार होते, पण सततच्या पावसामुळे विलंब झाला. आता दसऱ्यानंतर हे काम पुन्हा सुरू होणार असून, त्यासाठी 6 दिवसांपर्यंत काही पाइपलाइन बंद राहतील.
Siddharth udyan : पर्यटकांसाठी पर्वणी, सिद्धार्थ उद्यानात आले नवे पाहुणे, पाहा खास PHOTOS
advertisement
नवीन योजनेअंतर्गत शहरातील 30 नवीन जलकुंभ मनपाला हस्तांतरित होणार आहेत. त्यामुळे एकूण 60 जलकुंभांमधून झोननिहाय नियोजन करून पाणीपुरवठा केला जाईल. विशेष म्हणजे, आजवर पाणी न मिळालेल्या ‘नो-नेटवर्क’ भागांनाही या योजनेमुळे लाभ होणार आहे.
नवीन योजनेचा पहिला टप्पा अंतिम टप्प्यात
सध्या पाणीपुरवठा योजनेचे 85-86% काम पूर्ण झाले आहे. जॅकवेलचे बांधकाम आणि पंप बसवण्याचे काम वेगात सुरू असून ते पूर्ण होण्यास आणखी दीड महिना लागण्याची शक्यता आहे. डिसेंबरपर्यंत शहराला 200 MLD नवीन पाण्याचा पुरवठा सुरू होईल, असा अंदाज आहे.
शहरातील पाणी योजना अजूनही अपूर्ण
शहरभरातील 1900 किमी पाइपलाइनपैकी अर्धेच काम पूर्ण झाले आहे. 52 पैकी सुमारे 26 जलकुंभांचे बांधकाम अद्याप प्रलंबित आहे. आता नवीन पाणीपुरवठा योजनेशी संबंधित तांत्रिक कामासाठी येत्या काही दिवसांत 6 दिवसांचा शटडाऊन घेतला जाणार आहे. या काळात पाणी दाबात घट आणि काही भागांत अपुरा पुरवठा राहील.
नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा
शटडाऊनदरम्यान 900 मिमी व्यासाची पाइपलाइन बंद राहील, तर 1200 मिमीची मुख्य वाहिनी सुरूच राहणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचा पुरवठा बंद होणार नसला तरी पाण्याचा दाब कमी राहील. पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना काळजीपूर्वक पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे.