रेल्वे क्रमांक 17425/17426 असलेली ही साप्ताहिक एक्स्प्रेस तिरुपतीहून आठवड्यातील मंगळवारी सकाळी 11.10 वाजता सुटेल. गुंटूर, सिकंदराबाद, विकाराबाद, परळी, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर अशा महत्त्वाच्या मार्गांवरून प्रवास करत ही गाडी पुढे निघेल. बुधवारी दुपारी 12.58 वाजण्याच्या सुमारास ही ट्रेन छत्रपती संभाजीनगरात दाखल होईल.
advertisement
त्यानंतर निर्धारित वेळापत्रकानुसार पुढील प्रवास करत, ही गाडी बुधवारी सायंकाळी 6.35 वाजता श्री साईनगर शिर्डी स्थानकात पोहोचणार आहे. या गाडीमुळे तिरुपती आणि शिर्डीला जाणाऱ्या भाविकांना अधिक सोयीस्कर, आरामदायी आणि थेट रेल्वे सुविधा उपलब्ध होणार असून, दोन्ही तीर्थक्षेत्रांमधील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
December 08, 2025 12:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
भाविकांसाठी आनंदाची बातमी, तिरुपतीसह शिर्डीसाठी धावणार आता साप्ताहिक रेल्वे, वेळ इथं चेक करा






