मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही गरीब आणि गरजू महिलांसाठी असतानाही १४ हजारांहून जास्त पुरुषांनी त्या योजनेचे पैसे घेतल्याचे समोर आल्यानंतर शासनाच्या हेतूवर अनेकांनी शंका उपस्थित करून पडताळणी प्रकियेवर आक्षेप नोंदवला होता. लाडकी बहीण ही मतांसाठी सुरू केलेली योजना होती, अशी टीकाही सरकारवर झाली. सरकारच्या तिजोरीवर वर्षाला जवळपास ४६ हजार कोटींचा ताण पडल्याने शासनस्तरावर वेगवान पडताळणीला सुरुवात झाली.
advertisement
संशयित २६ लाख खात्यांची माहिती पडताळणीच्या कामाला सुरुवात
महिला आणि बालकल्याण खात्याकडून केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान खात्याने पाठवलेला २६ लाख लोकांची माहिती पडताळणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर पुढील १५ दिवसांत कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत. २६ लाख लाभार्थ्यांपैकी काही लाख महिलांचे खाते नसल्यामुळे त्यांनी कुटुंबातील पुरुषांच्या बँक खात्याची माहिती त्यावेळी जोडली आल्याची बाब समोर आली आहे. अशा महिलांचा लाडक्या बहिणींचा लाभ सुरूच राहणार मात्र ज्या बोगस खात्यांची माहिती समोर येईल त्यांच्याकडून ११ महिन्यांचे पूर्ण पैसे वसूल करण्यात येणार आहेत तसेच त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करणार
महिला व बालकल्याण खात्याकडून बोगस खातेधारकांकडून ११ महिन्यांचे १६ हजार ५०० रुपये वसूल करण्यात येणार आहेत. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.