कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्याने या खासगी सचिवांची, विशेष अधिकाऱ्यांची पळापळ सुरू झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्र्यांकडे सेवा देत राहिलेल्या सचिवांना बजावलेल्या नोटिसांमध्ये ‘बेकायदेशीरपणे आपण त्या ठिकाणी कार्यरत आहात’ असा ठपका ठेवत, तात्काळ मूळ खात्यात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या नोटिसांची झळ लागल्यानंतर शिवसेनेच्या नाराज मंत्र्यांमध्ये खळबळ उडाली असून, काही मंत्री थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याच्या फेऱ्या मारत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे 5 मंत्री या कारवाईचे लक्ष्य ठरत असल्याने पक्षपाती वागणूक दिली जात असल्याची नाराजी व्यक्त करत आहेत. हा विषय आता पुढील मंत्रीमंडळ बैठकीत चर्चेला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
विश्वासू व्यक्ती असतात खासगी सचिवपदी...
सत्तेत असलेले मंत्री आपल्या अत्यंत विश्वासातील व्यक्तींना पीए आणि ओएसडीसारख्या पदांवर नियुक्त करतात. त्यामुळे या नियुक्त्यांवरून सत्ताधारी पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मात्र यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियंत्रण ठेवत मंजुरी नाकारल्याने भाजपच्या मंत्र्यांनाही आपल्या विश्वासू व्यक्तींच्या नेमणुकीसाठी हात आखडता घ्यावा लागत आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, भाजपच्या अनेक मंत्र्यांनाही स्वतःच्या खास माणसांना सचिव म्हणून नेमायचं आहे, मात्र देवेंद्रजींच्या पुढे त्यांचीही बोलती बंद झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता महायुतीमध्ये खासगी सचिवांच्या नियुक्तीवरून धुसफूस वाढणार की हे वादळ पेल्यातच शमणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.