गुरुवारी सकाळी राज ठाकरे मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये पोहोचले. त्याच दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा पोहचला. त्यामुळे आज दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार असल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चांवर काही वेळेत शिक्कामोर्तब झाले. एका बाजूला शिवसेना ठाकरे गटाकडून युतीसाठी सकारात्मक भूमिका घेतली जात असताना दुसरीकडे आज राज यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
advertisement
बैठकीत कोण होतं सहभागी?
हॉटेल ताज अॅण्ड लँड्स मध्ये भाजप आणि मनसेत चर्चा सुरू आहे. ही चर्चा एकूणच आगामी मुंबई महापालिका आणि इतर निवडणुकीबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. आजच्या या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे दोघेच बैठकीत आहेत. या बैठकीत इतर कोणत्याही नेत्याचा समावेश नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे
बंद दारआडच्या बैठकीत काय झालं?
तब्बल तासानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हॅाटेल मधून बाहेर पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात जवळपास तासभर बैठक चालली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.