TRENDING:

Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच, 48 तासात वाढले शिंदे-फडणवीसांचे आमदार, वर्षावर कोण जाणार?

Last Updated:

मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही आहेत, तर इकडं एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करावं अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही आहेत, तर इकडं एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करावं अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. मुख्यमंत्रिपदाचा फैसला दिल्लीत होण्याची शक्यता आहे, मात्र त्यापूर्वी दोन्ही बाजूनं दबावतंत्राचा अवलंब केला जात आहे. तसंच अपक्षांना आपल्या गोटात घेऊन पाठीराख्या आमदारांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न भाजप आणि शिवसेनेकडून केला जात आहे. विधानसभेत जास्तीत जास्त मताधिक्य आपल्या बाजूनं वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच, 48 तासात वाढले शिंदे-फडणवीसांचे आमदार, वर्षावर कोण जाणार?
मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच, 48 तासात वाढले शिंदे-फडणवीसांचे आमदार, वर्षावर कोण जाणार?
advertisement

विधानसभा निवडणुकीत भाजपनं जबरदस्त कामगिरी केली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात घवघवीत यश मिळावलं आहे. त्यांची विधानसभेसाठी आखलेली रणनीती यशस्वी करुन दाखवली, तसेच विधानसभेत आपलं संख्याबळ वाढवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

भाजपला 5 अपक्षांचा पाठिंबा

भाजपनं राज्यात 132 जागा जिंकल्या आहेत. तसंच छोटे पक्ष, अपक्ष अशा 5 आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे आणि अशोक माने, युवा स्वाभीमानी पक्षाचे रवी राणा, अपक्ष शिवाजी पाटील यांचा समावेश आहे. या अपक्षांच्या पाठिंब्यामुळे विधानसभेत भाजपचं संख्याबळ 137 वर जावून पोहोचलं आहे आणि त्यामुळेचं भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांचं नाव पुढे केलं जात आहे.

advertisement

एकीकडे भाजप फडणवीसांच्या नावासाठी आग्रही आहे तर दुसरीकडे शिवसेनेने एकनाथ शिंदेंचं नाव लावून धरलं आहे. महायुतीनं विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढवली होती. लोकसभेत महायुतीची मोठी पिछेहाट झाली होती, पण विधानसभेत महायुतीनं बाजी उलटवली. शिंदेंच्या नेतृत्वात विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळालं. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमाधून शिंदेंनी महायुतीच्या बाजूनं जनमत वळवण्यात यश मिळवलं. खरं तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आव्हान असतानाही शिंदेंनी विजयश्री खेचून आणली. ही शिंदेंच्या बाजूनं जमेची असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. दरम्यान शिंदेंनी अपक्षांना गळाला लावून विधानसभेत आपलं संख्याबळ वाढवण्यास सुरुवात केली आहे.

advertisement

शिंदेंकडे 2 अपक्ष आमदार

शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेनं 57 जागा मिळवल्या. तर जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे आणि शिरोळमधून निवडून आलेले राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे विधानसभेत शिवसेनेचं संख्याबळ 59 वर जावून पोहोचली आहे. आणि त्यामुळेचं शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदेंच्या नावाचा आग्रह केला जात आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

रविवारी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं अभिनंदन केलं, यावेळी मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकनाथ शिंदेच अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. इकडे मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधीच्या लाभार्थ्यांनी सिद्धिविनायक मंदिरात जावून शिंदे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून साकडं घातलं. या सगळ्या घडामोडी पाहाता मुख्यमंत्रिपदावरून स्पर्धा तीव्र झाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच, 48 तासात वाढले शिंदे-फडणवीसांचे आमदार, वर्षावर कोण जाणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल