TRENDING:

भाजपसोबत युती करणं महागात, काँग्रेस नगरसेवकांना प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा दणका, मोठी कारवाई

Last Updated:

काँग्रेस-भाजपच्या युतीची देशभरात चर्चा होत असताना दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी गंभीर दखल घेऊन ही युती मान्य नसल्याचे सांगितले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अंबरनाथ नगरपालिकेत भाजपने शिंदे गटाला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसशी आघाडी केली आहे. भाजप काँग्रेसच्या युतीत सत्ताप्रिय अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस देखील सहभागी आहे. काँग्रेस-भाजपच्या युतीची देशभरात चर्चा होत असताना दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी गंभीर दखल घेऊन ही युती मान्य नसल्याचे सांगितले. काँग्रेस पक्षाने सर्व नगरसेवकांना पक्षातून निलंबनाची कारवाई केली आहे.
हर्षवर्धन सपकाळ
हर्षवर्धन सपकाळ
advertisement

"आपण अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली असून आपल्या पक्षाचे बारा सदस्य निवडून आलेले आहेत. मात्र आपण प्रदेश कार्यालयास कोणतीही माहिती न देता अंबरनाथ नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांसोबत गटबंधन केल्याचे प्रसार माध्यमांद्वारे कळाले. ही बाब अत्यंत चुकीची असून पक्षशिस्तीचा भंग करणारी आहे", अशा शब्दात काँग्रेसच्या पक्षनेतृत्वाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

advertisement

सर्व नगरसेवकांचे पक्षातून निलंबन

ही बाब लक्षात घेता प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून आपणास काँग्रेस पक्षामधून निलंबित करण्यात येत आहे. तसेच आपली ब्लॉक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे आपल्या सोबत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या सर्व नगरसेवकांना सुद्धा पक्षामधून निलंबित करण्यात येत असल्याचे काँग्रेसने प्रसिद्धीपत्रकातून सांगितले.

भाजपच्या नगराध्यक्षा पदभार कार्यक्रमात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना मानाचे स्थान

advertisement

भाजपच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुळे यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. त्यांनी संभाव्य युती-आघाड्यांच्या उभारणीला वेग आला. शिंदेसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप-काँग्रेसने युती करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेतले. विशेष म्हणजे भाजपच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुळे यांच्या पदग्रहण सोहळ्यात काँग्रेसचे १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांना पहिल्या रांगेत मानाचे स्थान मिळाले. या आश्चर्यकारक युतीवर राज्यासह देशभरातून विविध प्रतिक्रिया समोर येत होत्या.

advertisement

तो संपूर्ण निर्णय भाजपचा- श्रीकांत शिंदे

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनचे दर वाढले, कापूस आणि तुरीला आज काय मिळाला भाव? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

दुसरीकडे कुणाशी कुठे युती करायची याचा संपूर्ण निर्णय भाजपचा आहे, आम्ही अधिक बोलू इच्छित नाही, असे भाजप काँग्रेसच्या युतीवर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. कुणाला कुणाशी युती-आघाडी करायची हे ज्याने त्याने ठरवावे, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपसोबत युती करणं महागात, काँग्रेस नगरसेवकांना प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा दणका, मोठी कारवाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल