मुंबईत तीन जागांवर उमेदवार
काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत मुंबईतील तीन जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत. यात कांदिवली पूर्वमधून काळु बधेलिया, चारकोप यशवंत सिंग आणि सायन कोळीवाडा मतदारसंघात गणेश यादव यांना तिकीट दिलं आहे.
नात्यागोत्यात तिकीट
अकोटमधून सुधाकर गणगणे यांचे पुत्र महेश गणगणे यांना तर अर्नी मतदारसंघातून शिवाजीराव मोघे यांचे पुत्र जितेंद्र मोघे यांना तिकीट दिलं आहे. सावनेरमध्ये सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी दिली आहे.
advertisement
कुणाचा पत्ता कट, कुणाला संधी?
काँग्रेसने श्रीरामपूरचे विद्यमान आमदार लहू कानडे यांचा पत्ता कट केला आहे. तिथं हेमंत ओगले यांना संधी देण्यात आलीय. याशिवाय राळेगावमधून माजी मंत्री वसंत पुरके यांना पुन्हा उमेदवारी दिलीय. तर यवतमाळमध्ये कमी फरकारने गेल्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या बाळासाहेब मांगुळकर यांना तिकीट दिलं आहे.
महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांमध्ये ९०-९०-९० फॉर्म्युला ठरला असल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं होतं. आतापर्यंत काँग्रेसनं ७१ तर शिवसेना ठाकरे गटाने ८० उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शऱद पवार गटाकडून ४५ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
