Congress Candidate Second List : सावनेरमधून केदारांची बायको, बावनकुळेंविरोधात तगडा उमेदवार, काँग्रेसची दुसरी यादी जाहीर
- Published by:Suraj
Last Updated:
Congress Candidate Second List : काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जारी केली आहे. या यादीत २३ उमेदवारांची नावे आहेत.
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रसने आता दुसरी यादी जाहीर केलीय. काँग्रेसने पहिल्या यादीत ४८ नावे जाहीर केली होती. तर तिसऱ्या यादीत २३ उमेदवारांची नावे आहेत. श्रीरामपूरचे विद्यमान आमदार लहू कानडे पत्ता कट करण्यात आलाय. त्यांच्या जागी हेमंत ओगले यांना तिकीट देण्यात आलंय. सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना सावनेरमधून उमेदवारी देण्यात आलीय. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात सुरेश भोयार या तगड्या उमेदवाराला संधी दिली आहे.
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची शुक्रवारी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर काही जागांवर शिक्कामोर्तब झाले. आतापर्यंत काँग्रेसने ७१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
भुसावळ - राजेश मानवतकर
जळगाव - स्वाती वाकेकर
अकोट - महेश गांगणे
वर्धा - शेखर शेंडे
सावनेर - अनुजा केदार
नागपूर दक्षिण - गिरीश पांडव
कामठी - सुरेश भोयार
advertisement
भंडारा पुजा ठावकर
अर्जुनी मोरगाव - दिलीप बनसोड
आमगाव - राजकुमार पुरम
राळेगाव - वसंत पुरके
यवतमाळ अनिल बाळासाहेब मांगुळकर
अर्नी - जितेंद्र मोघे
उमरखेड - साहेबराव कांबळे
जालना - कैलास गोरंट्याल
औरंगाबाद पूर्व - मधुकर देशमुख
वसई - विजय पाटील
कांदिवली पूर्व - काळु बधेलिया
चारकोप - यशवंत सिंग
advertisement
सायन कोळीवाडा - गणेश यादव
श्रीरामपूर - हेमंत ओगले
निलंगा - अभयकुमार साळुंखे
शिरोळ - गणपतराव पाटील

Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 26, 2024 11:25 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Congress Candidate Second List : सावनेरमधून केदारांची बायको, बावनकुळेंविरोधात तगडा उमेदवार, काँग्रेसची दुसरी यादी जाहीर









