प्रकाश आष्टे आणि दिलीप भालेराव यांच्यासह त्यांचे समर्थक आज मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत 20 नगरसेवक, 16 जिल्हा परिषद सदस्य, एक बाजार समिती सभापती आणि नऊ संचालक भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत. याशिवाय, दोन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक देखील काँग्रेसचा 'हात' सोडून भाजपमध्ये दाखल होणार आहेत.
लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडत आहे. मुंबई येथे भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हे सर्व नेते भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश करतील. प्रवेशापूर्वी, प्रकाश आष्टे आणि दिलीप भालेराव यांनी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. हा लातूर जिल्ह्यात वर्चस्व राखून असलेले काँग्रेस नेते अमित देशमुख यांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
advertisement
या मोठ्या प्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे, तर भाजपला मोठा फायदा होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ आल्या असताना, हा प्रवेश भाजपला लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात मोठी बळकटी देणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.