यंदाची नवरात्री असणार खास, नऊ नव्हे दहा दिवसांचा उत्सव; पण कारण काय?
उत्तर सोलापूर तालुक्यात राहणारे शेतकरी अमोल भोसले यांनी दोन एकरामध्ये काकडीची लागवड केली आहे. काकडीची लागवड करत असताना भोसले यांनी मल्चिंग पेपर टाकून लागवड केली आहे. तसेच मिरची आणि घेवड्या ची देखील लागवड केली आहे. आंतरपीक घेण्याचा कारण म्हणजे एका पिकाची जर नुकसान झाले तर दुसऱ्या पिकावरून उत्पन्न मिळते. तर काकडीची लागवड करत असताना शेतामध्ये जाळी लावून केली आहे. जाळी लावून काकडीची लागवड केल्यामुळे उत्पादन देखील चांगला मिळतो. तर त्याच जाळीवर फाउंडेशन करून घेवडाची लागवड केली आहे. फाउंडेशन वर घेवडा पसरते व तोडण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही.
advertisement
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोत महिलाराज! 100 पायलट्सची होणार भरती
आंतरपीक घेत असताना घेवडा आणि मिरचीवर कोणताही रोग पडू नये म्हणून थ्रिप्सचं नियोजन करावे लागत. त्यामुळे मिरचीची लागवड मल्चिंग पेपर वर केल्याने शेतामध्ये गवत येत नाही. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव कमी होतो आणि औषधाची सुद्धा कमी खर्च येतो व पैशाची बचत होते. तर काकडी हा दोन महिन्याचा पिक असून काकडे वरील लागवडीचा खर्च वजा केल्यास 3 लाख रुपयाचा उत्पन्न मिळतो. तर घेवडा आणि मिरचीच्या विक्रीतून 4 लाखाचा उत्पन्न मिळतो. शेतकऱ्यांनी पिकाची लागवड करण्याअगोदर योग्य नियोजन करून पिकाची लागवड केल्यास तसेच पिकामध्ये आंतरपीक घेतल्यास अधिकाधिक उत्पन्न मिळेल असा सल्ला प्रयोगशील शेतकरी अमोल भोसले यांनी दिला आहे.